अमेरिका : दहशतवादाविरोधात अमेरिका (America) कायम कठोर पावलं उचलत असते. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनला (Osama Bin Laden) ठार मारुन अमेरिकेने आपली ही भूमिका स्पष्ट देखील केली होती. अमेरिकेच्या सर्वात चांगल्या आणि उत्कृष्ट अधिकाऱ्यांची निवड या मोहिमेसाठी करण्यात आली होती. त्यातीलच एक असलेला माजी नेव्ही अधिकारी  रॉबर्ट जे. ओ'नीलला अमेरिकेतील टेक्सासमधून अटक करण्यात आली आहे. 


ओसामा बिन लादेनला केले होते ठार


रॉबर्ट जे.ओ'नील या 47 वर्षीय अधिकाऱ्याने ओसामा बिन लादेनला ठार मारले होते असं सांगितलं जातं. पण सध्या याच अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपाखाली रॉबर्ट जे. ओ'नीलला अटक करण्यात आली आली आहे. तसेच मारहाणीचा आरोपही या अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. पण माहितीनुसार, सध्या त्याच्यावर फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


रॉबर्ट नीलने 2013 मध्ये आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, मे 2011 मध्ये ऑपरेशन 'नेपच्यून स्पीयर' दरम्यान ओसामा बिन लादेनला त्याने ठार केले होते. पण त्यानंतर रॉबर्टवर फ्रिस्कोमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु ज्या दिवशी त्याला अटक करण्यात आली त्याच दिवशी 3500 डॉलरचा दंड भरल्याने त्याला सोडण्यात आले होते. सध्या रॉबर्ट हा एका पॉडकास्टचे रेकॉर्डिंग करण्यासाठी टेक्सासमध्ये आल्याची माहिती मिळत आहे. 


कोण आहे रॉबर्ट जे.ओ'नील? 


अमेरिकेतील नेव्हीमध्ये टीम सीलचा रोबर्ट हा माजी सदस्य आहे. ओसामा बिन लादेनला मारणाऱ्या टीमचा देखील तो एक महत्त्वाचा भाग होते. ओसामा बिन लादेनला गोळी झाडल्यानंतर तो प्रकाशझोतात आला. पण त्याच्या या दाव्याला अमेरिकेच्या सरकारने कधीही दुजोरा दिला नाही किंवा त्याला खोटेही ठरवले नाही. दरम्यान रॉबर्टला अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील 2016 मध्ये त्याला दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 


रॉबर्टने त्याच्या एका मुलाखतीमध्ये लादेनला ठार मारल्याचा संपूर्ण प्रसंग सांगितला होता. पण अमेरिकेच्या सैन्याने त्याचा हा दावा मोडीत काढला होता आणि रॉबर्टने सैन्याच्या काही कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोपही त्याच्यावर केला होता. त्यामुळे रॉबर्टने ओसामा बिन लादेनला खरचं मारलं का या प्रश्नाच्या उत्तरावर अजूनही अनेक संभ्रम आहेत. तसेच त्याच्यावर आता करण्यात आलेल्या आरोपांमुळे कोणती कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Kolkata STF: बिहारचा तरुण हनीट्रॅपच्या विळख्यात; कोलकाता पोलिसांनी केली अटक