Elon Musk : इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात अग्रेसर असलेल्या टेस्ला (Tesla) कंपनीचे संस्थापक आणि सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी जॉब सोडून इन्फ्ल्यूएन्सरचे  काम करण्याच्या त्यांच्या विचाराबाबत सांगितले आहे.  एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (world's richest man) आहेत. त्यांनी या ट्वीटमधून नोकरी सोडण्याचा विचार मांडल्याने नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. 


एलन मस्क हे रॉकेट कंपनी SpaceX चे संस्थापक आणि CEO देखील आहेत. तसेच ते ब्रेन-चिप स्टार्टअप न्यूरालिंक आणि इन्फ्रास्ट्रक्चर फर्म द बोरिंग कंपनीचे नेतृत्व करतात.  एलन मस्क यांनी जानेवारीमध्ये एका कॉन्फरन्स कॉलमध्ये अनेक वर्षे टेस्लाचे सीईओ राहण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. पण त्यांनी नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये नोकरी सोडण्याबाबत सांगितले. 


एलन मस्क यांचे ट्वीट
एलन मस्क यांनी ट्वीटमध्ये लिहिले, 'मी जॉब  सोडण्याचा आणि पूर्णवेळ इन्फ्ल्यूएन्सरचे काम करण्याचा विचार करत आहे. तुम्हाला काय वाटते? ' त्यांच्या या ट्वीटला रिप्लाय देत एका नेटकऱ्याने त्यांना YouTube चॅनल स्टार्ट करण्याचा सल्ला दिला. एलन मस्क यांच्या सोशल मीडिया पोस्ट या नेहमी चर्चेत असतात. 


गेल्या महिन्यात, त्याने ट्विटरवर त्याच्या फॉलोअर्सना विचारले की,  इलेक्ट्रिक-कार निर्मात्यामधील त्याच्या 10% हिस्सेदारीची विक्री करावी की नाही? ज्याला काही लोकांनी सहमती दिली होती. तेव्हा त्यांनी जवळपास $12 अब्ज किमतीचे शेअर्स विकले आहेत.






300 अरब डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असणारे पहिले व्यक्ती 


एलन मस्क एक काही दिवसांपूर्वी 300 अरब डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असणारे पहिले व्यक्ती झाले. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्स यांच्या रिपोर्टनुसार मस्क यांची एकूण संपत्ती ही 302 बिलियन डॉलर झाली आहे.  


संबंधित बातम्या


Tesla is Hiring AI Engineers : टेस्ला एआयमध्ये नोकरीची संधी, 'या' उमेदवारांना करता येणार अर्ज 


Twitter Trends 2021 : 'हे' हॅशटॅग ठरले सर्वाधिक ट्रेंडिग