Tesla is hiring AI engineers: यूएस-आधारित इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात अग्रेसर असलेल्या टेस्ला (Tesla) कंपनीमध्ये नोकरीची संधी आहे. टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरद्वारे (Twitter) या भरतीबाबतची माहिती दिली आहे. 


संस्थापक मस्क यांनी या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठीची लिंकही आपल्या ट्वीटमध्ये दिली आहे. या नोकरीबद्दल उत्सूक असलेले उमेदवार नाव, ईमेल, सॉफ्टवेअर, हार्डवेअर किंवा AI मध्ये याआधी केलेल्या कामाच्या अनुभवाची माहिती भरून अर्ज करू शकतात. उमेदवार आपला बायोडाटा PDF फॉरमॅटमध्ये टाकून Apply पर्याय दाबून अर्ज करू शकतात.


 'आर्टिफिशियल इंटिलीजन्स' च्या  (artificial intelligence, AI)आधारे  रोजच्या समस्या सोडवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अभियंत्याना (engineers) या नोकसीसाठी अर्ज करता येणार आहे. 






 


टेस्ला हार्डकोर AI अभियंत्यांच्या शोधात आहे. जे लोकांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या समस्या सोडवण्याची काळजी घेतात. टेस्लाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोपायलट युनिट "वाहने, रोबोट्सची मोठ्या प्रमाणावर निर्मिती आणि वितरण करते. जगातील ही एक अग्रगण्य कंपनी आहे. 


नियुक्त केलेल्या उमेद्वारांना FSD चिप, डोजो चिप, डोजो सिस्टम्स, न्यूरल नेटवर्क्स, स्वायत्त अल्गोरिदम, कोड फाउंडेशन, मूल्यमापन इन्फ्रास्ट्रक्चर आणि कंपनीचे संपूर्ण सेल्फ-ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर आणि इतर तंत्रज्ञान चालविण्यासाठी वापरले जाणारे टेस्ला बॉट विकसित आणि तैनात करण्याचे काम करावे लागणार आहे.


संबंधित बातम्या



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI