एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड कशी होईल?

मुंबई : जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण विराजमान होणार? बराक ओबामांची जागा कोण घेणार? हिलरी क्लिंटन की डोनाल्ड ट्रम्प? याविषयची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी 8 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीचं स्वरूप काय आहे आणि त्यात काय पणाला लागलं आहे, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून... वर्णद्वेषाचे आरोप, भांडलवदारांशी जवळीक, महिलांविषयी असभ्य टिप्पणी, ईमेल स्कँडल इत्यादी इत्यादी... यंदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचं हे चित्रं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प या उमेदवारांमधल्या चढाओढीनं महासत्तेची काळी बाजूच समोर आणली आहे. आधुनिक जगातल्या सर्वात ताकदवान लोकशाहीच्या सिंहासनासाठी ही चढाओढ, व्हाईट हाऊसची सत्ता मिळवण्यासाठीची शर्यत आता अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. हिलरी यांच्या रूपानं पहिल्यांदाच एक महिला राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे तर दुसरीकडे राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या ट्रम्पनाही मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. या दोघांशिवाय अन्य काही छोट्या पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारही या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळण्याची चिन्हं नाहीत. कशी होईल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड? 8 नोव्हेंबर रोजी म्हणजे येत्या मंगळवारी अमेरिकेच्या 50 राज्यांतील सुमारे 12 कोटी मतदार मतदान करतील. तर निवडणुकीचा निकाल भारतीय वेळेनुसार 9 नोव्हेंबरला सकाळपर्यंत हाती येईल. सध्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेलसह अनेकांनी आधीच मतदानाचा हक्क बजावला आहे. भारतात आपण मतदान करतो, तेव्हा आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतो. पण अमेरिकेत मतदानाची पद्धत थोडी वेगळी आहे. तिथे मतदार थेट उमेदवारासाठी नाही तर प्रतिनिधी म्हणजे इलेक्टर्स निवडण्यासाठी मत देतात. प्रत्येक राज्यातील इलेक्टर्सची संख्या ही त्या राज्यातून अमेरिकेच्या संसदेत निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येएवढी असते. अशा प्रतिनिधींची सभा म्हणजेच इलेक्टोरल कॉलेज. अमेरिकेतील 50 पैकी 48 राज्यांतील नियमांनुसार त्या राज्यात सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या पक्षालाच राज्यातील सर्व इलेक्टर्सचा पाठिंबा मिळतो. अमेरिकेतील सर्व राज्य आणि राजधानीचा डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया धरून एकूण 538 इलेक्टर्स आहेत. त्यापैकी 270 जणांचा पाठिंबा मिळवणारा उमेदवार राष्ट्राध्यक्षपदी निवडून येईल. दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली, तर त्यातून एकाची निवड करण्याचा अधिकार अमेरिकेची संसद म्हणजे काँग्रेसकडे आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसोबतच अमेरिकेच्या संसदेतील जागांसाठी, तसंच काही राज्यांत गव्हर्नरपदासाठी आणि स्थानिक पातळीवरील निवडणुकाही एकाच दिवशी होणार आहेत. पण सगळ्या जगाचं लक्ष आहे ते राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीकडे. आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीमुळं ही निवडणूक जणू बदनाम झाली आहे. तसंच, जगासमोरच्या संकटांचा सामना करू शकेल, असं कणखर नेतृत्त्व हिलरी किंवा ट्रम्प असं नेतृत्त्व देऊ शकतील का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?
फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?
France Protest :  महागाई, शाळा आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर उतरले, 1200 जणांना अटक, पंतप्रधानांची माहिती 
फ्रान्समध्ये पुन्हा आंदोलक रस्त्यावर, महागाई आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
University of Chicago Crime News: बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Gokul Election Result 2026: गोकुळचा निकाल बाजूने लागला पण अचानक 'अदृश्य' शक्ती सक्रिय, दगाफटक्याची कुणकुण लागताच सतेज पाटील-राजू शेट्टी मतमोजणी केंद्रावर पोहोचले अन्...
गोकुळचा निकाल बाजूने लागला पण अचानक 'अदृश्य' शक्ती सक्रिय, दगाफटक्याची कुणकुण लागताच सतेज पाटील-राजू शेट्टी मतमोजणी केंद्रावर पोहोचले अन्...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Embed widget