Blast in Afghanistan:अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचा उद्रेक सुरुच आहे. आज पुन्हा एकदा शिया समुहाच्या मशिदीला दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, पूर्व अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील स्पिन घर येथील मशिदीजवळ आज दुपारी झालेल्या स्फोटात तीन ठार झाले असून मौलानासह किमान 19 जण जखमी झाले आहेत.
मशिदीजवळ राहणाऱ्या अटल शिनवारी यांनी बॉम्बस्फोटाबाबत माहिती दिली. हा स्फोट दुपारी दीडच्या सुमारास झाला. जास्तीत जास्त लोकांना लक्ष्य करण्यासाठी मशिदीच्या आत स्फोट घडवून आणण्यात आल्याचंही शिनवारी यांनी म्हटलंय. गेल्या महिन्यातही अफगाणिस्तानमध्ये शुक्रवारीच मशीदीत स्फोट झाला होता. कंधार शिया मशीदीत झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 32 जणांचा मृत्यू झाला होता.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, ज्या मशिदीमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला तेव्हा मशिदीमध्ये सुन्नी मुसलमान आहे. अफगाणिस्थानात तालिबानची सत्ता आल्यानंकर मशिदीमध्ये बॉम्बस्फोटाच्या घटना वाढल्या आहे. काही दिवसांपूर्वी शिया मशिदीवर हल्ले करण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अफगाणिस्तानातील कुंदूज शहरातील एका मशिदीत बॉम्बस्फोट करण्यात आला होता. ज्या स्फोटाची जबाबदापरी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने घेतली होती. या घटनेत 80 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी देखील होती.
या अगोदर 15 ऑक्टोबरला कंधार शहरातील शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या दरम्यान मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 37 जणांचा मृत्यू झासा आणि 70 जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामक स्टेटने घेतली. तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदने अफगाणिस्थानातील कंधारमधील शिया मशिदीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
संबंधित बातम्या :