नवी दिल्ली : जगातील महासत्ता म्हणून ओळखण्यात येणाऱ्या अमेरिकेला चीन, इटली पाठोपाठ कोरोनानं केंद्र बनवलं आहे. अमेरिकेत कोरोनाचा कहर थांबायचं नाव घेत नाही. अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या 1.87 लाखांवर पोहोचली आहे. मागील 24 तासांमध्ये अमेरिकेत 700हून अधिक लोकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत कोरोनाच्या बळींची संख्या चीनपेक्षा जास्त झाली आहे.


कोरोनामुळे अमेरिकेत लाखो बळी जाण्याची तेथील तज्ज्ञांना भीती


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसमध्ये तज्ज्ञांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यावेळी झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये. 'अमेरिकेत जर वेळीच आवश्यक ती काळजी घेऊन उपाययोजना केल्या नाहीत, विषाणूचा प्रसार रोखला नाही आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला नाही तर अमेरिकेत 15 लाख ते 22 लाख लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडू शकतात. तसेच अमेरिकेतील कोरोनाा प्रादुर्भाव पाहता, जरी सर्व काळजी घेतली तरिदेखील 1 ते 2 लाख लोकांचा जीव जाऊ शकतो, असंही मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. याबाबत बोलताना हा आकडा कमीत कमी ठेवण्यासाठी देशात योग्य त्या उपाय योजना केल्या जात असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढिल 30 दिवस देशासाठी महत्त्वाचे असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


पाहा व्हिडीओ : कोरोनाच्या संसर्गामुळे अमेरिका हादरली; 24 तासात 850 रुग्णांचा बळी



वॉशिंग्टनमध्ये लोकांना घरीच राहण्याचे आदेश


जगभरातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या सध्या अमेरिकेत आहे. न्यूयॉर्कनंतर अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमध्येही लोकांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


अमेरिकेत मृत्यू झालेल्यांची संख्या 3000 पार


अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3000 पार पोहोचली आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडा हा गेल्या 100 वर्षांतील इतिहासात महामारीमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत सर्वाधिक आहे. अमेरिकेमध्ये 9/11 च्या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या संख्येपेक्षा अधिक संख्या कोरोनाच्या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची आहे.


अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती : डॉ. अँथनी फाऊची


अमेरिकेत कोरोना महामारीचं संकट दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. येत्या काही दिवसात अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 1 लाख ते 2 लाखांपर्यंत पोहचू शकते, अशी भीती नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन डिजीजचे संचालक प्रख्यात संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसात अमेरिकेतील व्हेंटिलेटर्स संपू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला होता.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा दावा


Coronavirus Outbreak | अमानवी पाकिस्तान! लॉकडाऊनच्या काळात हिंदूंना अन्न-धान्य देण्यास नकार


Coronavirus | कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली, जर्मनीत अर्थमंत्र्याची आत्महत्या


Coronavirus | स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचं निधन; शाहीपरिवारातील कोरोनाचा पहिला बळी