एक्स्प्लोर

जगभरात पहिल्यांदाच 24 तासांत 4 लाखांहून अधिक कोरोना बाधित; भारतातील परिस्थिती काय?

Coronavirus : जगभरात पहिल्यांदाच एकाच दिवसांत 4 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासांत जगभरात पहिल्यांदाच सर्वाधिक 4.12 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

Coronavirus : जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. संपूर्ण जगाला या जीवघेण्या व्हायरसने वेठीला धरलं आहे. दरदिवशी जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच जगभरात पहिल्यांदाच एकाच दिवसांत 4 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासांत जगभरात पहिल्यांदाच सर्वाधिक 4.12 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच याआधी एकदिवस अगोदर 3.97 लाख नवे कोरोना बाधित आढळून आले होते. या व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत 6185 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वर्ल्डोमीटरनुसार, जगभरात आतापर्यंत 3 कोटी 95 लाख 65 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 11 लाख 8 हजार 617 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2 कोटी 96 लाख 48 हजार रुग्ण बरे झाले आहेत. संपूर्ण जगभरात केवळ 88 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह केस आहेत.

टॉप-10 कोरोना बाधित देशांची यादी

कोरोना महामारीमुळे सर्वात जास्त प्रभावित देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच या देशात झपाट्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. येथे आतापर्यंत 82 लाख 88 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकेत मागील 24 तासांत 71 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेनंतर या यादीत भारताचा समावेश होतो. भारतात 74 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. येथे गेल्या 24 तासांत 65 हजार रुग्ण आढळून आले आहेत. तसेच अमेरिका आणि भारतानंतर कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव ब्राझीलमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. ब्राजीलमध्ये गेल्या 24 तासांत 30 हजार रुग्ण आढळून आले आहेत.

अमेरिका : एकूण रुग्ण 8,288,278, मृत्यू 223,644 भारत : एकूण रुग्ण 7,430,635, मृत्यू 113,032 ब्राजील : एकूण रुग्ण 5,201,570, मृत्यू 153,229 रशिया : एकूण रुग्ण 1,369,313, मृत्यू 23,723 स्पेन : एकूण रुग्ण 982,723, मृत्यू 33,775 अर्जेंटीना : एकूण रुग्ण 965,609, मृत्यू 25,723 कोलंबिया : एकूण रुग्ण 945,354, मृत्यू 28,616 पेरू : एकूण रुग्ण 862,417, मृत्यू 33,648 मेक्सिको : एकूण रुग्ण 834,910, मृत्यू 85,285 फ्रान्स : एकूण रुग्ण 834,770, मृत्यू 33,303

पाहा व्हिडीओ : सकाळच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या

13 देशांमध्ये 5 लाखांहून अधिक कोरोना बाधित

जगभरातील 13 देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 5 लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये साऊथ आफ्रिका, यूके आणि इराण यांचाही समावेश आहे. जगभरातील 60 टक्के लोकांचा मृत्यू केवळ सहा देशांमध्ये झाला आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझील, भारत, मेक्सिको, ब्रिटन, इटली या देशांचा समावेश होतो. तर जगभरातील केवळ चार देशांमध्ये 85 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या चार देशांमध्ये जवळपास 6 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या जगभरातील मृत्यूंच्या संख्येच्या एकूण 40 टक्के इतकी आहे.

भारत जगभरात सर्वाधिक कोरोना संसर्गाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. एवढचं नाहीतर सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचसोबत भारत असा दुसरा देश आहे, जिथे सर्वात जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget