Coronavirus | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरातील 213 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. मागील 24 तासांमध्ये 1 लाख 7 हजार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत 3157 ने वाढ झाली आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 71.89 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 8 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 35 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 60 टक्के कोरोना बाधित रुग्ण फक्त 7 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये मिळून कोरोनाग्रस्तांची संख्या 43 लाख आहे.


जगभरात कोणत्या देशात काय परिस्थिती?


कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेमध्ये पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये 20 लाख लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. तर आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, सध्या अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये नवे रुग्ण आणि मृतांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांमध्ये ब्राझीलमध्ये 18,925 नवे रुग्ण समोर आले आणि 813 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 19037 नवे रुग्ण आढळून आले आणि 586 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. ब्राझीलनंतर रुस आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.


पाहा व्हिडीओ : कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांसोबत एक दिवस! सहा.पो.निरीक्षक राखी गेडाम मडावी



अमेरिका : एकूण रुग्ण 2,026,486, एकूण मृत्यू 113,055
ब्राझील : एकूण रुग्ण 710,887, एकूण मृत्यू 37,312
रूस : एकूण रुग्ण 476,658, एकूण मृत्यू 5,971
स्पेन : एकूण रुग्ण 288,797, एकूण मृत्यू 27,136
यूके : एकूण रुग्ण 287,399, एकूण मृत्यू 40,597
भारत : एकूण रुग्ण 265,928, एकूण मृत्यू 7,473
इटली : एकूण रुग्ण 235,278, एकूण मृत्यू 33,964
पेरू : एकूण रुग्ण 199,696, एकूण मृत्यू 5,571
जर्मनी : एकूण रुग्ण 186,205, एकूण मृत्यू 8,783
इराण : एकूण रुग्ण 173,832, एकूण मृत्यू 8,351


7 देशांमध्ये दोन लाखांहून अधिक रुग्ण


ब्राझील, रूस, स्पेन, यूके, इटली, भारत या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त नऊ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. सहा देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन, ब्राझील) असे आहेत, जिथे 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.13 लाखांच्या पार पोहोचला आहे. चीन टॉप-17 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला असून भारताचा टॉप-6 देशांमध्ये समावेश झाला आहे.


संबंधित बातम्या : 


न्यूझीलंड देश कोरोनामुक्त, पंतप्रधान जसिंडा अर्डेन यांची घोषणा


चिनी वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग, बहिष्काराची मोहीम अपयशी ठरेल; चीनने भारताला खिजवलं


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ट्विटरवर का ट्रेण्ड होतोय?


'लांसेट'ने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनबाबत अभ्यास मागे घेतला, 200 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं!