नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 60 हजारांवर गेली आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 160731 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 23 लाख 31 हजारांवर पोहोचली आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे. सहा लाख रुग्ण बरे झाले आहेत तर अजुन जवळपास पावणे सोळा लाख लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 55 हजार 265 गंभीर आहेत.


अमेरिकेने 39 हजार बळींचा आकडा ओलांडला आहे. गेल्या 24 तासात १,८६७ बळी कोरोनामुळे गेले आहेत. अमेरिकेत एकूण बळी ३९ हजार १४ झाले आहेत. तर  रुग्णांची संख्या सात लाख ३९ हजारांवर पोहोचली आहे. 


न्यूयॉर्क प्रांतात काल 540 बळी गेले. तिथे रुग्णांची संख्या 2 लाख 41 हजार तर एकूण मृतांचा आकडा 17671  इतका आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 4070, मिशिगन मध्ये 2308, मासाचुसेट्स 1560, लुझियाना 1267, इलिनॉईस 1259, कॅलिफोर्निया 1147, पेनसिल्वानिया 1102, कनेक्टिकट 1086आणि वॉशिंग्टनमध्ये 624 लोकांचा बळी या रोगाने घेतलाय.


कोरोनाविरोधात भारताच्या लढाईला स्वित्झर्लंडचा अनोखा सलाम, प्रसिध्द आल्प्स पर्वतावर भारतीय तिरंगा

 स्पेनने गेल्या चोवीस तासात 637लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा 20 हजार 639वर पोहोचला आहे. तर काल इटलीत कोविड-19 रोगाने 482 माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या 23 हजार 227इतकी झाली आहे. काल रुग्णांची संख्या साडे तीन हजारांनी वाढली,  इटलीत आता जवळपास 1 लाख 76 हजार रुग्ण आहेत.


 इंग्लंडने काल दिवसभरात 888 लोकं गमावली, तिथला बळीचा आकडा पोहोचला 15464 वर पोहोचला आहे.


फ्रान्सने काल दिवसभरात 642 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 19 हजार 323 बळी गेले आहेत. तिथं एकूण रुग्ण 1लाख 51 हजार इतके आहेत.


जर्मनीत कोरोनामुळं काल 186 बळी गेले. तिथं एकूण बळींची संख्या 4538 इतकी झाली आहे. तर इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल 73 ची भर पडली आहे तर एकूण 5031 मृत्यू झाले आहेत. रुग्णांची संख्या 80868 इतकी झाली आहे.


कोरोनाने बेल्जियममध्ये काल 290 मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा 5453 वर पोहोचला आहे.


हॉलंडमध्ये काल 142 बळी घेतले तिथे एकूण 3601 लोक दगावले आहेत.


टर्की 1890,  ब्राझील 2361, स्वित्झर्लंडने 1368, स्वीडनमध्ये 1511, पोर्तुगाल ६८७, कॅनडात १४७०, इंडोनेशिया ५३५, तर इस्रायलमध्ये १६४ बळी कोरोनामुळे गेले आहेत.


दक्षिण कोरिया  काल २ मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा २३२पोहोचला आहे.


आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या ७,६३८ वर पोहोचली आहे. तिथे कोरोनाने 143 लोकांचा बळी घेतला आहे.


गेल्या २४ तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ८१,२८७ तर बळींच्या आकड्यात  ६,५०५ ची भर पडली आहे.



संबंधित बातम्या : 


दारु, बंदुक, चॉकलेट अन् बरचं काही.. वेगवेगळ्या देशांमध्ये अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वस्तू

Coronavirus | अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला!

Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज

Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू