एक्स्प्लोर

Coronavirus | जगभरात 10 लाखांहून अधिक कोरोना बाधित; इटली-स्पेन, अमेरिका-ब्रिटनमध्ये परिस्थिती गंभीर

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढतच जात असून जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 10 लाख पार पोहोचला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही. जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा दहा लाखांच्या पार गेला आहे. तर आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एका दिवसांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे. अर्ध्याहून अधिक जग लॉकडाऊनमध्ये असूनही कोरोनाचा विषाणू अत्यंत वेगाने फोफावत आहे. इटली, स्पेन, अमेरिका आणि ब्रिटनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जगभरातील मृतांच्या आकड्यात तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगभरात 1 लाख 98 हजार 390 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 59 हजार 159 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत दोन लाख 28 हजार 923 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 14,681 लोकांचा मृत्यू झाला असून 119,827 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मृतांच्या आकड्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्पेन असून आतापर्यंत 11,198 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 119,199 लोक कोरोना बाधित आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत मृतांचा आणि कोरोना बाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. आतापर्यंत 7392 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 277,161 लोक कोरोनाग्रस्त आहेत. पाहा कोणत्या देशात सर्वाधिक कोरोनाचा कहर आहे? Coronavirus | जगभरात 10 लाखांहून अधिक कोरोना बाधित; इटली-स्पेन, अमेरिका-ब्रिटनमध्ये परिस्थिती गंभीर फक्त युरोपमध्ये कोरोना व्हायरसमुळे 40,000 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. यामधील तीन चतुर्थांशपेक्षा अधिक लोकांचा इटली, स्पेन आणि फ्रान्समध्ये मृत्यू झाला आहे. अमेरिकन नागरिकानं त्यासाठी तयार राहावं; डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन अमेरिकेत कोरोना महामारीचं संकट दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. येत्या काही दिवसात अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 1 लाख ते 2 लाखांपर्यंत पोहचू शकते, अशी भीती नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन डिजीजचे संचालक प्रख्यात संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसात अमेरिकेतील व्हेंटिलेटर्स संपू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत, विशेषत: न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा अतिशय वेगानं फैलाव झाला आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे अतिशय वाईट असू शकतात, असं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारीच म्हटलं होतं. पुढील काही दिवस अतिशय अवघड असणार आहेत. प्रत्येक अमेरिकन नागरिकानं त्यासाठी तयार राहावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं. संबंधित बातम्या :  Coronavirus | कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेची भारताला 7500 कोटींची मदत PM Modi | 5 एप्रिलला वीज बंद करुन घरात दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्चचा प्रकाश करा : पंतप्रधान मोदी Corona Lockdown | 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावं? पंतप्रधानांनी दिल्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना Corona | सर्वधर्मीय गुरुंना गर्दी न होण्याबाबत आवाहन करा, मुख्यमंत्री ठाकरेंची सूचना, पंतप्रधान म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget