नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे जगभरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 14 हजार पार गेली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 5 हजार 461 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांबाबत बोलायचे झाले तर इटलीमध्ये 651 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

इटलीमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. त्यातही गेल्या रविवारपासूनचे आकडे जास्त भितीदायक आहेत.

इटलीमधील मृतांची आकडेवारी : 

15 मार्च 368
16 मार्च 349
17 मार्च 345
18 मार्च 475
19 मार्च 427
20 मार्च 627
21 मार्च 793
22 मार्च 651

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरातील इतर देशांतही पाहायला मिळत आहे. चीनमध्ये 3 हजार 261, अमेरिकेत 419, स्पेनमध्ये 1 हजार 756, इराणमध्ये 1 हजार 685 आणि फ्रान्समध्ये 674 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या अमेरिकेमध्ये कोरोनाचा कहर वाढतच जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये 100 हून अधिक लोकांचा कोरोनामुळए मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक माहिती म्हणजे, चीनमधील वुहानमध्ये सलग पाचव्या दिवशी एकही कोरोना बाधित नाही.

पाहा व्हिडीओ : कोरोनाचा जगभरात धुमाकूळ इटली, फ्रान्स, स्पेन, इराण, चीनमध्ये मृत्यूचं वाढतं प्रमाण

जगभरातील जवळपास सर्वच देश कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. झपाट्याने पसरत असलेल्या या व्हायसर पुढे अमेरिका, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलियासारखे अनेक मोठे देश हतबल दिसत आहेत. वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहिल्यानंतर कुणाला वाचवायचं आणि कुणाला नाही, असा प्रश्न डॉक्टरांना पडत असल्याचं चित्र आहे.

भारतातही कोरोनाचं सावट

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 396 कोरोना बाधित आहेत. देशामध्ये सतत कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. अशातच गुजरातमधील सुरतमध्ये 67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर बिहार आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | कोरोनाची घाबरवणारी आकडेवारी, पाच दिवसात हजारो लोकांचा मृत्यू

Coronavirus | सावधान! बाहेर फिरू नका; मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरात संचारबंदी लागू

Coronavirus | कोरोना व्हायरसची क्रोनोलॉजी सांगते तिसरी स्टेज महत्वाची

coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती

Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, देशभरातील रेल्वे वाहतूकही 31मार्चपर्यंत बंद