मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहेत. यानुसार आज मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आता जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. तर, पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेला जनता कर्फ्यू वाढवण्यात आला आहे. उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्य शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांसह अन्य काही जिल्ह्यांचा यात समावेश आहे.


राज्यात वाढत जाणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहता राज्य सरकारने महाराष्ट्र लॉक डाऊनचा निर्णय अखेर घेतला आहे. सोबतच पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेला जनता कर्फ्यू वाढवण्यात आला आहे. त्यानुसार उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत हा कर्फ्यू राहणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्यातील काही शहरांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

जनता कर्फ्यू : राजकीय नेत्यांपासून सातपुड्यातील आदीवासींकडून अत्यावश्यक सेवा कर्माचाऱ्यांचे आभार

सावधान बाहेर फिरू नका
पुण्यात आज रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पहाटे पाचनंतर जमावबंदी असेल पण लोक पाचपेक्षा कमी संख्येने किंवा एकट्याने रस्त्यांवर येऊ शकतील, याला आपण जमावबंदी म्हणतो. त्यामुळे सावधान बाहेर फिरू नका. पुण्यात बाहेर चकाट्या मारणाऱ्याना पोलिसांनी धडा शिकवलाय. पुण्यासोबत औरंगाबाद शहरातही आज रात्री 9 ते उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, पनवेल या शहरांमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, पनवेल आणि कळंबोली परिसरात कर्फ्यूचे उल्लंघन केल्या प्रकरणी तीन गुन्हे दाखल झालेत. संचारबंदी असतानाही याचे उल्लंघन करून बाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या 55 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, पालघर जिल्ह्यातही संचार बंदीचा निर्णय पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी घेतला आहे. रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. नागपूर शहर आधीच लॉक डाऊन केलं आहे. आता उद्या पहाटे पाच पर्यंत शहरात संचारबंदी असणार आहे.

Coronavirus | कोरोना व्हायरसची क्रोनोलॉजी सांगते तिसरी स्टेज महत्वाची

महाराष्ट्र बंद!
अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात लॉकडाऊन केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज मध्यरात्रीपासून राज्यात कलम 144 लागू होणार आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक जण सार्वजनिक ठिकाणी फिरु शकणार नाहीत. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या गुणकाराने वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नाईलाजाने हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Janta Curfew | Coronavirus | जनता कर्फ्यूला राज्यातील ग्रामीण भागात कसा प्रतिसाद मिळाला?