तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या दरम्यान मालगाड्या सुरू राहणार असल्याची माहिती आहे. याआधीच पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे तसेच कोकण रेल्वेने अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.
कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबवण्यासाठी सरकारने कालच मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास बंद करण्यात आला होता. फक्त सरकारी कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सीसाठीच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती, अशी माहिती कोकण विभागीय आयुक्तांनी काल दिली होती.
मुंबईतील लोकलमधून रोज लाखो प्रवास ये जा करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा सर्वाधिक धोका मुंबईत निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आज अत्यावश्यक सेवेशी संबंधित नसणाऱ्यांना उद्या रेल्वे स्टेशनवर प्रवेशच दिला जात नाहीये, सर्वांना शासकीय किंवा अत्यावश्यक सेवेशी संबंधित असल्याचं ओळखपत्र पाहूनच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळत आहे. आता मुंबईतील लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
- पिंपरी चिंचवड मनपा - 12
- पुणे मनपा - 15
- मुंबई - 25
- नागपूर- 4
- यवतमाळ - 4
- नवी मुंबई - 3
- कल्याण - 4
- अहमदनगर - 2
- रायगड - 1
- ठाणे - 1
- उल्हासनगर - 1
- औरंगाबाद - 1
- रत्नागिरी - 1
संबंधित बातम्या :