मुंबई : चीनच्या वुहान प्रांतातून सुरू झालेलं कोरोना व्हायरसचं थैमान आता मोजके देश वगळता जगभरात पोहचलं आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वुहान येथून कोरोनाची लागण सुरू झाली अन् पाहता पाहता जगभर पसरली. आतापर्यंत जवळपास तीन लाख लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. तर, 11 हजाराहून जास्त लोकांची यात बळी गेलाय. जिथून या आजाराला सुरुवात झाली त्या चीनमध्ये यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. मात्र, कोरोनाचं नवं केंद्र आता युरोप झालं आहे. मृतांच्या संख्येत इटलीने चीनलाही मागे टाकलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये सहाशेहून अधिक लोकांचा मृत्यू इटलीत झालाय. भारतातही हा आजार वेगाने पसरायला सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोरोनाची प्रत्येक आठवड्यातील नव्या रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा याची क्रोनोलॉजी समजून घेऊ.
कोरोना विषाणू चार स्टेजमध्ये पसरतो. सध्या देशात आणि राज्यातील सरकार चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळताना दिसत आहे. राजस्थान, पंजाब नंतर आता महाराष्ट्रातही अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉक डाऊन करण्यात आलं आहे. आज आपण या आजाराच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहोत. चौथा टप्पा तर खूपच गंभीर असेल. त्याला तोंड देण्याची तयारी आतापासून करणे गरजेचे आहे. यासाठी आता सर्वसामान्य नागरिकांना सरकारच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.
#Coronavirus | महाराष्ट्र लॉकडाऊन! संपूर्ण राज्यात आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू : मुख्यमंत्री
कोरोना व्हायरसच्या स्टेज
कोरोनाची स्टेज 1 - विदेशातून भारतात आलेल्या व्यक्तीपासून लागण
कोरोना स्टेज 2 - संपर्कातील लोकांना विषाणूची लागण
कोरोना स्टेज 3 - बाधित व्यक्तींमुळे समाजातील इतरांना झालेली लागण
कोरोना स्टेज 4 - संपूर्ण जगात झपाट्याने प्रसार
भारतात सद्यस्थितीत कोरोना स्टेज 3 अवस्थेत आहे.
रुग्णांची संख्या दर आठवड्याला कशी वाढत गेली?
मृतांचा आकडा (Cumulative / एकूण ) कसा वाढत गेला?
महाराष्ट्र लॉकडाऊन!
अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज मध्यरात्रीपासून राज्यात कलम 144 लागू करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे पाचपेक्षा अधिक जण सार्वजनिक ठिकाणी फिरु शकणार नाहीत. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या गुणकाराने वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नाईलाजाने हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
Rajasthan Punjab Lockdown | राजस्थानपाठोपाठ पंजाबमध्येही लॉकडाऊनची घोषणा, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे आदेश