हॉन्गकॉन्ग : जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला असून आता हॉन्गकॉन्गमधील एका पाळीव कुत्र्यालाही कोरोना झाला असल्याची माहिती मिळत आहे. हॉन्गकॉन्गमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हॉन्गकॉन्गमध्ये राहणाऱ्या एका 60 वर्षीय वृद्ध महिलेच्या पाळीव कुत्र्याला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. पहिल्यांदाच माणसाकडून एखाद्या प्राण्याला संसर्ग झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
पामेरियन प्रजातीच्या या पाळीव कुत्र्याच्या मागील शुक्रवारपासून सतत तपासण्या सुरू होत्या. त्यानंतर त्याला कोरोना झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कुत्र्याला आता स्थानिक कृषी विभाग, मत्स्य आणि संरक्षण विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. या कुत्र्याची मालकीण 60 वर्षांची एक वृद्ध महिला आहे. तिला 25 फेब्रुवारी रोजी कोरोनाची लागण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.
दरम्यान, कोरोना व्हायरस (Covid-19) आतापर्यंत 60 पेक्षा अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. तसेच कोरोनाची लागण झाल्यामुळे जगभरात आतापर्यंत तील हजारपेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावा लागला आहे. तसेच 90 हजारांपेक्षा जास्त लोक याची लागण झाल्यामुळे ग्रस्त आहेत.
काय आहे कोरोना व्हायरस?
डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा संबंध थेट सी-फूडशी आहे. कोरोना व्हायरसमुळे लोक आजारी पडत आहेत. कारण या विषाणुंचा एक समूह थेट रूग्णांच्या शरीरावर इफेक्ट करत आहे. हा व्हायरस उंट, मांजर तसेच वटवाघुळ यांसारख्या अनेक प्राणी आणि पक्षांमध्ये पसरत आहे.
पाहा व्हिडीओ : N95 मास्कचा काळाबाजार, 150 रुपयांच्या मास्कची तब्बल 300 रुपयांना विक्री
81 देशात करोना व्हायरसचे थैमान
संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायसमुळे आतापर्यंत 3200 लोकांता मृत्यू झाला आहे. 12 जानेवारी पर्यंत फक्त चीन कोरोना व्हायरसशी लढत होता. परंतु आता महिन्यात कोरोना व्हायरस 81 देशांत पसरला आहे. मागील पाच दिवसात कोरोना व्हायरस 22 देशांत पसरला आहे. भारतात कोरोना व्हायरस जानेवारी महिन्यात दाखल झाला होता.
जगात कोरोनाचा उद्रेक! 3200 लोकांचा मृत्यू
कोरोना व्हायरस म्हणजे काय?
कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
लक्षणे कोणती आहेत ?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
काय काळजी घ्याल?
तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.
संबंधित बातम्या :
नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ, मात्र संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह
#CoronaVirus देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती
उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, किम जोंग यांचे गोळ्या घालण्याचे आदेश