नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा जगभरात हाहाकार माजला आहे. सगळीकडेच भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कोरोना व्हायरसपासून बचावासाठी नागरिकांना एक सल्ला दिला आहे. एखाद्या व्यक्तीला भेटताना हात मिळवण्यापेक्षा भारतीय पद्धतीने नमस्कार करावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

इस्राईलच्या भारतीय दूतावासाने नेतन्याहू यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. पत्रकार परिषदेत घेऊन कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे, यासाठी छोटे छोटे उपाय पंतप्रधान नेतन्याहू यांनी सांगितले. यामध्ये त्यांनी नमस्कार करण्याच्या भारतीय पद्धतीचाही उल्लेख केला.

Coronavirus | भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 28 वर : डॉ. हर्ष वर्धन

जगभरात कोरोना व्हायरसचं संकट असताना इस्राईलमध्येही कोरोना व्हायरस रोखण्यासाठी योग्य पावलं उचलली जात आहेत. याविषयी बोलताना नेतन्याहू यांनी म्हटलं की, इस्राईलमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. आयसोलेशन सुरु करण्यात आलं असून विमानतळांवरही विशेष निर्देश देण्यात आले आहेत. इस्राईलमध्ये कोरोनाच्या 15 रुग्णाची माहिती समोर आली आहे. मात्र कुणाचाही अद्याप मृत्यू झालेला नाही.

Yoga For Corona | योगासनांचा कोरोनाविरोधात कसा फायदा होतो? रामदेव बाबांचं मार्गदर्शन

कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी कोरोना बाधित लोकांच्या जवळ जाऊ नये. त्यांना हात मिळवणे किंवा गळाभेट घेणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरही देत आहेत. भारतात हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत आहे. एकमेकांपासून काही अंतरावरून नमस्कार केला जातो. त्यामुळे दोन व्यक्तींचा एकमेकांशी संपर्क येत नाही. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी ही पद्धत फायदेशीर ठरू शकते.

Coronavirus | 'कोरोना व्हायरस' होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? | ABP Majha