ढाका : बांग्लादेशमध्ये सीनियर डॉक्टरांच्या नेतृत्त्वात काम करणाऱ्या एका मेडिकल टीमने दावा केला आहे की, त्यांना कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या आजारावर उपचार करण्यासाठी एका प्रभावी औषधाचं कॉम्बिनेशन मिळालं आहे. टीमने सांगितलं की, दोन वेगवेगळ्या औषधांना एकत्र करून त्यावर रिसर्च करण्यात आलं, त्यावेळी कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णाला बरं करण्यात या औषधाचा आश्चर्यकारक परिणाम दिसून आला.


बांग्लादेशमधील मेडिकल टीमचा दावा आहे की, अनेक मोठ्या देशांमध्ये या व्हायरसबाबत शोध सुरु आहेत. बांग्लादेश मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (बीएमएचसी) मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर एमडी तारीक आलम यांनी सांगितलं की, 60 रुग्णांवर या औषधाचं परीक्षण करण्यात आलं आहे. या औषधामुळे हे 60 रुग्ण बरेही झाले आहेत. ते म्हणाले की, 'महत्त्वाचं म्हणजे, या औषधाचे कोणतेच साइड इफेक्ट्स नाहीत.'


तारीक आलम यांनी सांगितले की, एक अॅन्टीबायोटिक डॉक्सीसायक्लिन औषधासोबत अॅन्टीप्रोटोजोअल औषध रुग्णांना देण्यात येणार आहे. ज्याचा निकाल उत्तम मिळतो. ते म्हणाले की, माझी टीम फक्त कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी दोन औषधांचा शोध घेत होती. दरम्यान, बांग्लादेशमध्ये आतापर्यंत जवळपास 20,995 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे एकूण 314 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.


तारीक आलम पुढे बोलताना म्हणाले की, 'आम्ही सर्वात आधी रुग्णांची कोरोना टेस्ट करतो आणि जर ते पॉझिटिव्ह आढळून आले, तर त्यांना हे औषध दिलं जातं. ते म्हणाले की, 'अनेक कोरोना बाधित औषध दिल्यानंतर फक्त 4 दिवसांमध्ये बरे झाले आहेत. डॉक्टर आलम यांनी सांगितले की, आम्हाला 100 टक्के या औषधावर विश्वास आहे.'


जगभरात कोरोना लसीचा शोध; 'या' पाच देशांचे दावे काय?


दरम्यान, कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावा करणारा बांग्लादेश पहिला देश नसून याआधीही अनेक देशांनी कोरोनावर लस शोधल्याचे दावे केले आहेत. कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसवर लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. अनेक देशांनी
कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे.


कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी अमेरिका भारतासोबत काम करतेय : डोनाल्ड ट्रम्प


भारत-अमेरिका एकत्र येऊन कोरोनावर लस शोधणार : डोनाल्ड ट्रम्प 


भारतीय-अमेरिकन एक महान वैज्ञानिक आणि संशोधक आहेत, असं संबोधत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका एकत्र येऊन कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना व्हायरसवर प्रभावी लस विकसित होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, 'मी काही दिवसांपूर्वी भारत दौरा केला असून भारतासोबत एकत्र येऊन काम करत आहे. अमेरिकेमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यातील अनेक लोक लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते उत्तम वैज्ञानिक आणि संशोधक आहेत.'