Coronavirus | जीवघेणा कोरोना व्हायरस जगभरात वेगाने फोफावत आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 213 देशांमध्ये मागील 24 तासांमध्ये 82,247 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे 3617 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 48 लाख कोरोना बाधित लोक आहेत. तर आतापर्यंत 3 लाख 16 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 लाख 56 हजार 188 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 71 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त दहा देशांमधून समोर आले आहेत. या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 34 लाख एवढी आहे.


जगभरात कोणत्या देशांत किती मृत्यू?


जगभरातील एकूण रुग्णांपैकी जवळपास एक तृतियांश रुग्ण अमेरिकेमध्ये आहेत. तर एक तृतियांश मृत्यूही अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेनंतर इंग्लंडमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळत आहे. इंग्लंडमध्ये 34636 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 243,695 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इंग्लंडमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या रुस आणि स्पेनपेक्षा कमी आहे. यानंतर ब्राझील, इटली, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इरान, भारत, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये सर्वाधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.


पाहा व्हिडीओ : लॉकडाऊन 4 मध्ये मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंद, संध्या.7 ते सकाळी 7 कर्फ्यू



अमेरिका : एकूण रुग्ण, 1,527,654, एकूण मृत्यू 90,978
रुस : एकूण रुग्ण, 281,752, एकूण मृत्यू 2,631
स्पेन : एकूण रुग्ण, 277,719, एकूण मृत्यू 27,650
इंग्लंड : एकूण रुग्ण, 243,695, एकूण मृत्यू 34,636
ब्राझील : एकूण रुग्ण, 241,080, एकूण मृत्यू 16,118
इटली : एकूण रुग्ण, 225,435, एकूण मृत्यू 31,908
फ्रान्स : एकूण रुग्ण, 179,569, एकूण मृत्यू 28,108
जर्मनी : एकूण रुग्ण, 176,651, एकूण मृत्यू 8,049
टर्की : एकूण रुग्ण, 149,435, एकूण मृत्यू 4,140
इराण : एकूण रुग्ण, 120,198, एकूण मृत्यू 6,988


10 देशांमध्ये एक लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त :


स्पेन, इटली, इंग्लंड, रुस, ब्राझीलमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त चार देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. अमेरिकेसह या दहा देशांमध्ये एकूण 34 लाख 23 हजार कोरोनाग्रस्त आहेत. अमेरिकेव्यतिरिक्त रुस आणि ब्राझीलमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पाच देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन) असे आहेत, जिथे 25 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडा 90 हजारांच्या पार पोहोचला आहे. भारतातही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 91 हजारांच्या उंबरठ्यावर असून आतापर्यंत 2872 लोकांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या : 


 स्लोवेनिया देशाने कोरोनाला हरवलं; युरोपातील पहिला देश कोरोनामुक्त


कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी अमेरिका भारतासोबत काम करतेय : डोनाल्ड ट्रम्प

कोरोना विषाणू कधीच नष्ट न होण्याची शक्यता : जागतिक आरोग्य संघटना


गरीब देशांचं कर्ज माफ करावं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जगभरातील 300 लोकप्रतिनिधींची मागणी

जगभरात कोरोना लसीचा शोध; 'या' पाच देशांचे दावे काय?