वॉशिंगटन : भारतीय-अमेरिकन एक महान वैज्ञानिक आणि संशोधक आहेत, असं संबोधत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी भारत आणि अमेरिका एकत्र येऊन कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.


ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना व्हायरसवर प्रभावी लस विकसित होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, 'मी काही दिवसांपूर्वी भारत दौरा केला असून भारतासोबत एकत्र येऊन काम करत आहे. अमेरिकेमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यातील अनेक लोक लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते उत्तम वैज्ञानिक आणि संशोधक आहेत.'



ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आपले चांगले मित्र असल्याचं सांगितलं. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी बोलताना या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा त्याच्या काही दिवसांनी कोरोना व्हायरसवर परिणामकारक लस बाजारात उपलब्ध होऊ शकते, असं सांगतिलं आहे.


ट्रम्प यांच्याकडून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनात नियुक्त करण्यात आलेल्या एक माजी औषध कार्यकारी मोनसेप स्लोई यांनी बोलताना सांगितलं की, 'आमचा प्रयत्न या वर्षाच्या अखेरपर्यंत लस उपलब्ध करण्याचा आहे.' दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी रोज गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, त्यांना अमेरिकेतील आर्थिक व्यवहार पुन्हा सुरु होण्यासोबतच अर्थचक्र सुरळीत होताना पाहायचं आहे.


पाहा व्हिडीओ : Donald Trump यांचा सूर बदलला; हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यानंतर पंतप्रधान मोदींचे आभार मानले!



दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अमेरिका भारताला व्हेंटिलेटर दान करणार असल्याचंही सांगितलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं असून ते म्हणाले की, 'मला ही घोषणा करताना गर्व होत आहे की, संयुक्त राष्ट्र अमेरिका भारताला व्हेंटिलेटर दान करणार आहे. या महामारी दरम्यान, आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. आम्ही लस तयार करण्यासाठीही मदत करत आहोत. आम्ही मिळून अदृश्य शत्रूला हरवणार आहोत.'


काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी भारताला अतिरिक्त तीन दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याआधी ट्रम्प प्रशासनाने USAID च्या माध्यमातून भारताला 5.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मदत करण्याची घोषणा केली होती.


संबंधित बातम्या : 


कोरोना विषाणू कधीच नष्ट न होण्याची शक्यता : जागतिक आरोग्य संघटना


गरीब देशांचं कर्ज माफ करावं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जगभरातील 300 लोकप्रतिनिधींची मागणी


 जगभरात कोरोना लसीचा शोध; 'या' पाच देशांचे दावे काय?