एक्स्प्लोर

China Corona : शांघायमध्ये कोरोनाचा कहर, एका दिवसात 24 हजारांहून अधिक रुग्ण, अन्नधान्याचीही टंचाई

China Corona Update : चीनमध्ये कोरोनाने कहर केला आहे. सर्वात भयावह परिस्थिती शांघायमध्ये आहे. येथे सर्व कडक निर्बंधानंतरही कोरोनाची रुग्ण वाढ थांबत नाहीय.

China Corona Update : चीनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. शांघायमध्ये सर्वात भयावह परिस्थिती आहे. शांघायमध्ये लॉकडाऊन (Lockdown) आणि कडक निबंधांनतरही कोरोना संसर्ग थांबण्याचं नाव घेत नाहीय. शुक्रवारी शांघायमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळले. मिळालेल्या अहवालानुसार, शुक्रवारी दिवसभरात  24 हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये 20 हजार 700 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती, परंतु अहवाल पॉझिटिव्ह आला.

लॉकडाऊनचा काही फायदा नाही
चीन सरकारने 15 दिवसांपूर्वी शांघायमध्ये कोरोना रुग्ण वाढल्यामुळे कडक लॉकडाऊन लागू केला. मात्र त्यानंतरही शांघायमधील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. इथे दररोज सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाल्याचं आढळून येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, येथे दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शांघायसह चीनमधील इतर शहरांमध्ये कोरोना चाचण्यांवर अधिक भर दिला जात आहे. रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त खाटा आणि अतिरिक्त रुग्णालये बांधण्यात येत आहेत.

अन्नधान्याची टंचाई
कोरोनामुळे शांघाय अनेक दिवसांपासून लॉकडाऊन आहे. यामुळे जनतेला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. शांघायमध्ये अनेकांच्या घरात अन्न नाही. चीनच्या अधिकृत ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शांघायमध्ये कोरोनामुळे सर्वात वाईट परिस्थिती आहे. लोकांना अन्नधान्याचीही समस्या भेडसावत आहे. जनता सरकारविरोधात सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करत आहे. शांघायमध्ये उपचाराच्या प्रतीक्षेत असलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर लोकांमध्ये अधिक संतापाचं चित्र पाहायला मिळत आहे.

चीन मृत्यूची आकडेवारी लपवत आहे?

रिपोर्टनुसार, चीन पुन्हा कोरोनामुळे मृत्यूची आकडेवारी लपवत आहे. शुक्रवारी शांघायमधील रुग्णालयात सुमारे 12 वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं सांगण्यात आलं. चीन सरकारच्या आकडेवारीनुसार 2020 पासून शहरात या आजारामुळे एकही मृत्यू झालेला नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Shanghai Cooperation Organisation Meeting In Pakistan: SCO साठी भारतासह कोणकोणते देश पाकिस्तानात पोहोचले?; इस्लामाबादमध्ये नेमकं काय घडतंय?
SCO साठी भारतासह कोणकोणते देश पाकिस्तानात पोहोचले?; इस्लामाबादमध्ये नेमकं काय घडतंय?
Iran vs America : अमेरिकेची हेरगिरी करणारी पाणबुडी पकडल्याचा इराणचा दावा, होर्मुझच्या सामुद्रधुनीत IRGC ला मोठं यश, व्हिडिओ समोर  
अमेरिकेची मनुष्यविरहित पाणबुडी पकडल्याचा दावा, होर्मुझच्या सामुद्रधुनीत IRGC ची कारवाई  
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
Embed widget