Corona Cases News : जगभरातील काही देशांमध्ये कोरोनानं (Corona Cases In World) पुन्हा डोकं वर काढलं आहे. समोआतील प्रशांत द्वीप राष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसची (Corona Virus) पहिली केस समोर आली आहे. पहिला पेशंट सापडल्यानं लगेच देशात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सोबतच या देशानं आपल्या सर्व सीमा देखील सील केल्या आहेत.  सरकारनं हवाई आणि समुद्रमार्गे येणाऱ्या सर्व प्रवाशांना बंदी घातली आहे. सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदीचे आदेश देखील देण्यात आले आहेत.  


पंतप्रधान फियामे नाओमी माताफा यांनी म्हटलं आहे की, कोरोना पॉझिटीव्ह आलेली महिला 29 वर्षांची आहे. ती महिला फिजीला चालली होती. मात्र उड्डाण घेण्याच्या आधीच तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला.   ज्यानंतर पंतप्रधानांनी चार दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे.  


90 टक्के लोकसंख्येनं घेतली आहे कोविडची लस
पंतप्रधान फियामे नाओमी माताफा यांनी म्हटलं आहे की,  सार्वजनिक कार्यक्रम, चर्चा आणि आवश्यक सेवा वगळता अन्य सर्व सेवा आणि शाळा बंद राहतील. नागरिकांनी मास्क घालणं तसेच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे. तसेच लसीकरण कार्डचा उपयोग करणं देखील आवश्यक केलं आहे.  


समोआची लोकसंख्या 2 लाख आहे. इथं आता कोरोनाचा पहिला पेशंट सापडला आहे.   लीक झालेल्या सरकारी रिपोर्टच्या माहितीनुसार महिला मागील शनिवारपासून आजारी पडली होती. या महिलेनं चर्चच्या सेवाकार्यात देखील सहभाग नोंदवला होता. तसेच एक हॉस्पिटल, एक लायब्रेरी आणि एका ट्रॅव्हल एजन्सीसह काही भागांचा दौरा केला होता. 


सरकारी माहितीनुसार, समोआच्या एकूण लोकसंख्येपैकी 90 टक्के नागरिकांनी कोविडची लस घेतली आहे.  



महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha