Deltacron Variant : कोरोनाच्या आणखी एका नव्या व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट डेल्टाक्रॉननं जगाची धास्ती वाढवली आहे. असं सांगितलं जात आहे की, कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट आणि ओमायक्रॉन या दोघांपासून डेल्टाक्रॉनची उत्पत्ती झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने दिलेल्या माहितीनुसार, काही युरोपीय देश फ्रान्स, नेदरलँड्स आणि डेन्मार्कमध्ये काही रुग्णांना या नव्या डेल्टाक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्याचं निष्पन्न झालं आहे. 


काय आहे डेल्टाक्रॉन


जागतिक आरोग्य संघटनेनं गेल्या आठवड्यात 'डेल्टाक्रॉन' या नव्या व्हेरियंटची पुष्टी केली. वैज्ञानिकांनी सांगितलं की, हा व्हेरियंट डेल्टा आणि ओमायक्रॉन दोन्ही व्हेरियंट्सचा मिश्र प्रकार आहे. या व्हेरियंटची लागण झाल्यानंतर एक व्यक्ती, एकाच वेळी दोन व्हेरियंट डेल्टा आणि ओमायक्रॉननं संक्रमित होऊ शकते.  


डेल्टाक्रॉनची लक्षण 


युरोपातील आरोग्य सुरक्षा एजन्सी सध्या डेल्टाक्रॉनवर लक्ष ठेवून आहे. अशातच सध्या हा नवा व्हेरियंट किती घातक आहे, हे समजणं अवघड आहे. अद्याप तरी या नव्या व्हेरियंटची कोणतीही लक्षणं समोर आलेली नाहीत. 



  • ताप 

  • कफ

  • वास न येणं

  • सर्दी, नाक वाहणं

  • थकवा 

  • डोकेदुखी

  • श्वास घेण्यास त्रास होणं

  • अंगदुखी 

  • घशात खवखव

  • उलट्या होणं


संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नवा व्हेरियंट इतका घातक आहे. तसेच, तो अत्यंत सहज फैलावतो. जागतिक आरोग्य संघटना Covid-19 च्या तांत्रिक प्रमुख मारिया वान केरखोव यांनी एक पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, आम्हाला या नवीन प्रकाराच्या तीव्रतेमध्ये कोणताही बदल आढळला नाही. हा प्रकार किती धोकादायक आणि संसर्गजन्य आहे, हे शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञ त्यावर लक्ष ठेवून आहेत. WHO च्या शास्त्रज्ञांनी याचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली आहे. 


सायप्रस देशात आढळला 'डेल्टाक्रॉन' व्हेरियंट


सायप्रस विद्यापीठातील (Cyprus University) जीवशास्त्राचे प्राध्यापक आणि आण्विक विषाणूशास्त्राच्या प्रयोगशाळेचे प्रमुख लिओनडिओस कोस्ट्रिकिस (Leondios Kostrikis)  यांच्या मते, डेल्टा आणि ओमायक्रॉन यांचे संमिश्रण असलेला एक नवा व्हेरियंट 'डेल्टाक्रॉन' सायप्रसमध्ये आढळून आला आहे. प्रोफेसर लिओनडिओस कोस्ट्रिकिस म्हणाले की, सध्या ओमाक्रॉन आणि डेल्टा हे दोन वेगवेगळे व्हेरियंट आहेत. मात्र, दोन्ही प्रकारांच्या मिश्रणातून एक नवीन स्ट्रेन तयार करण्यात झाला आहे. यामध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या जीनोममधील रचना आढळून आल्यामुळे नव्या प्रकाराला 'डेल्टाक्रॉन' असे नाव देण्यात आले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Deltacron : धोका वाढला! 'या' देशात सापडला कोरोनाचा नवा 'डेल्टाक्रॉन व्हेरियंट'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha