Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसागणिक कमी होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 528 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 149 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दिवसभरात 3 हजार 997 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकुण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 29 हजार 181 वर पोहोचली आहे. देशातील कोरोना रुग्ण सकारात्मक दर 0.40 इतका झाला आहे.






केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 5,16,281 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, देशात गेल्या 24 तासांत 3997 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 4 कोटी 24 लाख 58 हजार 543 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 180 हून अधिक डोस देण्यात आले आहेत. 


भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग सध्या आटोक्यात आला असून रुग्णवाढीचा आलेखही खूप कमी आहे. परंतु शेजारील चीन आणि युरोपमधील काही देशांमध्ये परिस्थिती चिंताजनक बनत आहे. गेल्या काही आठवड्यांत तेथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. अशा परिस्थितीत भारताचीही चिंता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर धोका लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, आरोग्य सचिव यांना पत्र लिहून काही खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha