Google Maps crashes News : संपूर्ण जगात एका ठिकाणाहून दुसऱ्या माहित नसलेल्या ठिकाणी जाताना अनेकजण नेव्हिगेशन अॅप (Navigation App) वापरतात. यात गूगल मॅप्स (Google Maps) सर्वाधिक वापरला जातो. पण गुरुवारी रात्रीच्या सुमारास गूगल मॅप्सच (Google Maps Crash) भरकटल्याने अनेकांना अडचणी आल्या. भारतीय वेळेनुसार जवळपास 9:30 वाजले असताना, गूगल मॅप्स क्रॅश झाले होते. त्यामुळे अनेक वापरकर्ते दिशाहीन झाले. यावेळी वापरकर्त्यांना गूगल मॅप हे अॅप वापरत असताना अनेक अडचणी आल्या. तसंच वेबसाईटद्वारेही अॅप वापरता येत नव्हते. 


गूगल मॅप्स डाऊन होण्यामागील नेमके कारण समोर आलेले नाही. पण यामुळे अनेकांना डोकेदुखी झाली होती. अॅपमध्ये प्राॅब्लेम असेल यामुळे काहींनी नॉर्मल ब्राऊजरमधून गूगल मॅप्स (Google Maps Users) वापरण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याठिकाणी Error 500 आल्याचा मेसेज येत तेथूनही गूगल मॅप्स वापरता आले नाहीत. या सर्वामुळे सोशल मीडियावरही अनेकजणांनी तक्रार केली.



पर्याय म्हणून अॅपल मॅप्स


अचानक गूगल मॅप्समध्ये अडचण आल्याने काहींनी गूगल मॅप्सला बेस्ट पर्याय असणारे अॅपल मॅप्स (Apple Maps) डाऊनलोड केले. पण अॅपल मॅप्स हे केवळ अॅपल प्रो़डक्टसमध्येच (Apple Products) असल्याने अँड्रॉईड युजर्सना (Android Users) तेही करता आले नाही.



हे ही वाचा-



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live