एक्स्प्लोर

China Landslide : चीनमध्ये मोठी दुर्घटना! भूस्खलन होऊन 47 ढिगाऱ्याखाली अडकले; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

China Yunnan Province Landslide : चीनच्या दक्षिण-पश्चिम युनान प्रांतात भूस्खलन होऊन 47 हून अधिक लोक गाडले गेले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

China Landslide Updates : चीनमध्ये (China) भूस्खलन (Landslide) होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. चीनच्या युनान प्रांतात (Yunnan Province) भूस्खलन (Landslide Updates) होऊन सुमारे 40 हून अधिक लोक गाडले गेले आहेत. चिनी मीडिया रिपोर्टनुसार, युनान प्रांतात सोमवारी सुमारे 18 घरे गाडली गेली असून अनेक जण बेपत्ता आहेत. तर, 200 हून अधिक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. चिनी अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून 200 हून अधिक कर्मचाऱ्यांसह विविध उपकरणे घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.

चीनमध्ये भीषण दुर्घटना! 

China Xinhua वृत्तसंस्थेने एक्स मीडियावरील XHNews या अकाऊंटवरील ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, चीनच्या युनान येथे सोमवारी झालेल्या भूस्खलनात एकूण 47 लोक गाडले गेले आहेत. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी 33 अग्निशमन वाहने आणि 10 लोडिंग मशीनसह 200 हून अधिक बचाव पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

भूस्खलन होऊन 47 ढिगाऱ्याखाली अडकले

दुर्गम युनान प्रांतात भूस्खलन

चीनमधील युनान या दुर्गम भागात भूस्खलन होणे सामान्य आहे जेथे हिमालयाच्या पठारावर उंच पर्वतरांगा आहेत. सोमवारी युनानमधील डोंगरांनी वेढलेल्या ग्रामीण भागात भूस्खलनाची दुर्घटना घडली. चीनच्या युनान प्रांतात भूस्खलनाच्या घटना घडत असतात. हा चीनचा एक दुर्गम भाग आहे, जिथे मोठे पर्वत आहेत.

200 जणांची सुखरुप सुटका

चीनमधील युनान या डोंगराळ भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूस्खलनात 47 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून 200 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. दुर्घटनास्थळी अद्यापही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून मदत आणि बचाव कार्य अजून सुरू आहे. भूस्खलनात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या दक्षिण-पश्चिम प्रांत युनानमध्ये घडली. युनानमधील लियांगसुई गावात सोमवारी सकाळी सहा वाजता भूस्खलन झालं.

मदत आणि बचाव कार्य सुरू

झेनजियांग काउंटीमधील तांगफांग शहरामध्ये हा परिसर आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. भूस्खलनात 18 घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचं सांगितलं जात आहे. दुर्घटनाग्रस्त भागातून अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली अडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं प्रयत्न सुरू आहेत. भूस्खलन होण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget