Coronavirusअमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने म्हणजेच सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) या अमेरिकन एजन्सी ज्याने संसर्गजन्य आजारांबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता कोरोना संसर्ग झाल्यास केवळ पाच दिवसांचे विलगीकरण आवश्यक आहे. सध्या भारतासह सर्व देशांमध्ये हा कालावधी 7 ते 14 दिवसांचा आहे.


सीडीएसने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाविषयी शास्त्रज्ञांच्या ज्ञानात लक्षणीय वाढ झाली आहे, ज्याच्या आधारे नवीन नियम जारी केले जात आहेत. यामध्ये असे म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल तर त्याने फक्त पाच दिवस विलगीकरणामध्ये राहावे. जर पाच दिवसांनंतर लक्षणे दिसत नसतील किंवा 24 तास ताप नसेल तर मास्क घालूनही घराबाहेर पडता येईल. मात्र पुढील पाच दिवस मास्क घालणे आवश्यक असेल.


सीडीसीने सांगितले की ज्या लोकांना कोरोना लसीचे दोन डोस मिळाले आहेत त्यांनी पाच दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक आहे आणि जर ते कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले तर पुढील पाच दिवस मास्क घालणे आवश्यक आहे. पण जर पाच दिवस क्वारंटाईन शक्य नसेल तर दहा दिवस मास्क लावावा. अशा लोकांची पाच दिवसांनी चाचणी करावी. जर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर त्या व्यक्तीला निश्चितपणे पाच दिवस विलगीकरणात राहावे लागेल.


सीडीसीने पुढे म्हटले आहे की, कोरोना संसर्गाबाबत मिळालेल्या पुराव्यावरून असे समोर आले आहे की, कोरोना संसर्गाचा प्रसार एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसण्यापूर्वी एक किंवा दोन दिवस आधी आणि दोन-तीन दिवसांनी होतो. त्यामुळे पाच दिवसांचे विलगीकरण पुरेसे आहे. सीडीसीने असेही सुचवले आहे की, ज्या आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांना लक्षणे नाहीत ते सात दिवसांनी कामावर परत येऊ शकतात. परंतु त्यांची RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha