North Korea Missile Test : उत्तर कोरियाने पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. उत्तर कोरियाची ही नव्या वर्षातील पहिली क्षेपणास्त्र चाचणी आहे. किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सातत्याने क्षेपणास्त्र चाचणी करण्यात येत आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीवर जपान आणि दक्षिण कोरियाने नाराजी व्यक्त केली आहे
जगभरात आलेल्या कोरोना महासाथीच्या लाटेन अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम केला आहे. मागील वर्षातही उत्तर कोरियाने अनेकदा क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. आता नव्या वर्षातही उत्तर कोरियाकडून सातत्याने क्षेपणास्त्र चाचणी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दक्षिण कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने सकाळी 8.10 वाजण्याच्या सुमारास (2310 GMT मंगळवार) समुद्रात क्षेपणास्त्र डागले.
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेची गुप्तचर संस्था या चाचणीच्या तपशीलाचे बारकाईने विश्लेषण करत असल्याचे दक्षिण कोरियाच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कार्यालयाने सांगितले.
जपानदेखील उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीवर लक्ष ठेवून आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा यांनी म्हटले की, मागील वर्षभरात उत्तर कोरियाने अनेक वेळेस क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. जपान सरकारकडून उत्तर कोरियाने आतापर्यंत केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचे विश्लेषण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील आठवड्यात उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग उन यांनी भाषण केले होते. यामध्ये त्यांनी आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्याचे आवाहन केले होते.
मागील वर्षी, 2021 मध्ये उत्तर कोरियाने पाणबुडीतून मारा करणारी आणि ट्रेनमधून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. दक्षिण कोरियाने देखील उत्तर कोरियाच्या चाचणीला उत्तर देण्यासाठी क्षेपणास्त्र चाचणी केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- खचलेली अर्थव्यवस्था, महागाईचा विक्रमी उच्चांक; भारताचा 'हा' शेजारी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
- ओमायक्रॉनची लाट म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड; शास्त्रज्ञांचा दावा
- Kim Jong Un पुन्हा चर्चेत, नवा लूक पाहून लोकं हैराण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha