Chandrayaan 3: पुढील आठवडा भारतीय विज्ञान जगतासाठी खूप खास असणार आहे. भारताची महत्त्वाची अंतराळ मोहीम चांद्रयान-3 (Chandrayaan 3) एका आठवड्यात चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान चंद्राच्या भूमीवर उतरेल, असं सांगण्यात येत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये या सुवर्ण क्षणाची नोंद होईल. भारतासाठी हे एकमेव महत्त्वाचं मिशन आहे, पण अशा प्रकारच्या अनेक मिशन्समुळे चंद्रावर 'ट्रॅफिक जाम' सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, हे तुम्हाला माहित आहे का?
भारताने ज्याप्रमाणे आपलं चांद्रयान-3 मिशन चंद्रावर पाठवलं, त्याचप्रमाणे अनेक देशांनी चंद्रावर आपले उपग्रह पाठवले आहेत आणि चंद्राच्या कक्षेत इतर देशांच्या देखील अनेक मोहिमा आहेत, ज्या लवकरच चंद्रावर उतरणार आहेत. तुम्हाला माहित आहे का की, चांद्रयानाव्यतिरिक्त आणखी किती मोहिमा आहेत, ज्या लवकरच चंद्रावर उतरणार आहेत? तर अंतराळात कशी गर्दी आहे आणि अंतराळातील वातावरण कसं आहे? हे जाणून घेऊया.
चांद्रयान व्यातिरिक्त 'या' मोहिमा चंद्राच्या कक्षेत
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, चंद्राच्या कक्षेत सध्या 6 सक्रिय मोहिमा (Active Moon Missions) आहेत आणि इतर अनेक मोहिमा रांगेत आहेत. चांद्रयान व्यतिरिक्त इतर मोहिमांबद्दल बोलायचं झालं तर, नासाचं (NASA)लुनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर (Lunar Reconnaissance Orbiter, LRO), नासाच्या ARTEMIS अंतर्गत आणखी दोन मिशन, कोरिया पाथफाइंडर लूनर ऑर्बिटर (Korea Pathfinder Lunar Orbiter) आणि नासा कीस्टोनचा समावेश आहे. चांद्रयानाव्यतिरिक्त या मोहिमा सध्या चंद्राच्या कक्षेत आहेत.
काही उपक्रमांसाठी सॅटेलाईट्स चंद्राच्या कक्षेत
नासाचं लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर (Lunar Reconnaissance Orbiter) 2009 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं आणि त्याद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचा नकाशा बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय, ARTEMIS च्या P1 आणि P2 मोहिमा जून 2022 पासून चंद्राच्या कक्षेत आहेत. यासह, नासाचे कॅपस्टोन एनआरएच चंद्राच्या कक्षेत आहे.
यासह, आता रशियाचं लुना-25 मिशन प्रक्षेपित करण्यात आलं आहे, जे 16 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करू शकतं. याद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा शोध घेण्यात येणार असून, चांद्रयान देखील काही दिवसांतच चंद्रावर उतरणार आहे. चंद्र मोहिमांच्या वाढत्या संख्येमुळे, चंद्र वैज्ञानिकांचा शोध देखील सुरू आहे. अधिक मोहिमांमुळे परस्पर संघर्ष टाळण्यासारखी आव्हानं देखील वाढत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :