भारत-चीन सीमावाद : BRICS देशांच्या बैठकीत आज दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आमनेसामने
भारत आणि चीनदरम्यान सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज भारत आणि चीनचे परराष्ट्रमंत्री आमनेसामने येणार आहेत.
नवी दिल्ली: भारत आणि चीनदरम्यान सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. 29-30 ऑगस्टच्या रात्री लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा प्रयत्न झाला. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज भारत आणि चीनचे परराष्ट्रमंत्री आमनेसामने येणार आहेत. BRICS देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोघे आज एकमेकांच्या समोर असतील. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा डिप्लोमेटिक स्तरावर देखील उचलला आहे. मात्र दुसरीकडे चीनकडून मात्र भडकाऊ वक्तव्य येत आहेत. अशात आज BRICS देशांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष लागून आहे.
भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष
लष्करप्रमुख मनोज नरवणे लडाखच्या दौऱ्यावर
तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे लडाखच्या दौऱ्यावर आहेत. चीनसोबत वाढलेल्या तनावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल नरवणे हे आज फील्ड कमांडर यांच्यासह सैन्य तैनाती आणि अन्य तयारीचा आढावा घेणार आहेत. काल, गुरुवारी लष्करप्रमुखांनी काही फॉरवर्ड लोकेशन्सचा दौरा केला. आपल्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात लष्करप्रमुख सैनिकांच्या ऑपरेशनल तयारीचा का आढावा देखील घेणार आहेत. लष्करप्रमुखांच्या दौऱ्याआधी बुधवारी वायुसेना प्रमुख आर के एस भदौरिया यांनी पूर्व लडाखचा दौरा केला होता. वायुसेना प्रमुखांनी चीनच्या सीमेला लागून असलेल्या सिक्किम, असम, अरुणाचल, मेघालयमध्ये वायुसेनेच्या कॉम्बॅट यूनिट्सच्या आपरेशनल तयारीचा आढावा घेतला होता.
दरम्यान, केंद्र सरकारने चीनला आणखी एक दणका दिला. केंद्र सरकारने आणखी 118 चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे, यामध्ये PUBG अॅपचाही समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही बंदी घातली आहे. यानंतर चीनमधील गेमिंग आणि सोशल मीडिया कंपनी टेनसेंटचे शेअर 2 टक्क्यांनी घसरले आहेत. चीनच्या उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे की, आमच्या कंपन्यांना टारगेट केलं जात आहे.
भारत-चीनदरम्यान अधिकृत सीमेची आखणी नाही, त्यामुळे सीमावाद सुरूच राहणार : वांग यी
भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष झाला आहे. 29-30 ऑगस्टदरम्यान रात्री ही घटना घडली आहे. लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये ही झटापट झाली. चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान भारतानेही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. याआधी 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यांमध्ये हिंसक झटापट झाली होती. यामध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर चीनचंही मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावर चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या फ्लॅग मीटिंग सुरु आहे. मात्र त्यातच दोन्ही देशांमधील सैन्यांमध्ये झटापट झाल्याने तणाव पुन्हा वाढला आहे. दरम्यान झटापट झाल्याची अधिकृत माहिती भारतीय सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली आहे. मात्र यामध्ये जीवितहानी झाली आहे का, किंवा कोणत्या प्रकारचं नुकसान झालं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
काय म्हणाले होते चीनचे परराष्ट्र मंत्री युरोप दौऱ्यावर असणारे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी महत्वाचं वक्तव्य केलं होतं. वांग यी म्हटले होतं की, भारत-चीनमध्ये कोणत्याही प्रकारच्या अधिकृत सीमांची आखणी झाली नसल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यापुढेही वाद सुरूच राहतील. पण चीन भारताशी असलेल्या सर्व वादांच्या मुद्द्यांवर चर्चेतून मार्ग काढायला तयार आहे. त्यांनी हे वक्तव्य सोमवारी पॅरीसमधील ' फ्रेंच इंस्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स ' या संस्थेतील एका कार्यक्रमात केले. भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या मतभेदांचे संघर्षात रूपांतर न होण्यासाठी या दोन देशांच्या नेतृत्वामध्ये यापूर्वी एकमताने जे निर्णय झाले होते ते लागू करावेत, असेही ते म्हणाले. चीनचे भारत आणि जपानशी असलेल्या संबंधावर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते. परंतु पूर्व लडाखमध्ये चीनी लष्कराच्या घुसखोरीवर त्यांनी थेट उत्तर देण्याचं टाळलं.