सोनं देतो, सेxxxx करु द्या, खाण कामगारांचा अनोखा फंडा, 'या' देशात चाललंय काय?
खाणकाम कामगार लैंगिक गरज भागवण्यासाठी महिलांना सोन्याचं प्रलोभन देतात. सोन्याच्या बदल्यात शरीरसुख असा इथे व्यवहार चालतो.
ब्राझील : अवैधरित्या होत असलेलं खाणकाम हे संपूर्ण जगापुढे मोठं आव्हान आहे. अशा प्रकारच्या खाणकामात कोणतेही सरकारी नियम पाळले जात नाहीत. त्यामुळेच वायू प्रदूषण, जंगलतोड, ध्वनी, हवा प्रदूषण यासारखे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. दरम्यान, ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या जंगलात होत असलेल्या अवैध खाणकामामुळे तर हे प्रश्न जास्तच भीषण झाले आहेत. येथे फक्त प्रदूषणच नव्हे तर महिलांचे शोषण हा प्रश्नही निर्माण झाला आहे. शरीरसंबंधाच्या बदल्यात महिलांना इथं सोन्याचं प्रलोभन दिलं जात आहे.
महिलांना सोन्याच्या बदल्यात शरीरसंबंधाची मागणी
ब्राझीलमध्ये ॲमेझॉनच्या जंगलात काही ठिकाणी अवैध पद्धतीने खाणकाम केले जाते. या खाणकामात अनेक कामगार काम करतात. हेच कामगार आपली लैंगिक गरज भागवण्यासाठी महिलांना सोन्याच्या बदल्यात शरीरसंबंधाची मागणी करतात. तर दुसरीकडे हलाखीच्या परिस्थितीमुळे या भागात अनेक महिला देहविक्रीय व्यवसायात ढकलल्या जात आहेत. बीबीसीने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले असून एका 24 वर्षीय महिलेने आपली आपबीती सांगितली आहे. ही महिला सध्या इटेतुबा येथे वास्तव्यास आहे.
महिलेने सांगितलं नेमकं काय घडतंय?
या महिलेला वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी देहविक्रीय व्यवसायात यावे लागले. "या शहरात सर्वच महिला देहविक्रीय करतात असे मी म्हणणार नाही. मात्र देहविक्री करून जगणाऱ्या महिलांचे प्रमाण या भागात बरेच आहे. या भागात देहविक्रीय करणे हे फार सामान्य मानले जाते," असे या महिलेने सांगितले. देहविक्रीय व्यवसायात आल्यानंतर या महिलेने चार वर्षांनी एका बार मालकाशी लग्न केले. आता ही महिला दोन वेश्यालयं चालवते.
अनेक महिलांना कामगारांसोबत राहावे लागते
ॲमेझॉनच्या रेनफॉरेस्टमध्ये ज्या भागात खाणकाम चालू आहे, तेथे वास्तव्य करणे फार कठीण आहे. या भागातील रस्ते धुळीने माखलेले असतात. खाणकाम करणारेदेखील झोपण्यासाठी लाडकी झोपड्यांत राहायला खाणीतून बाहेर येतात. खाणकाम चालू असताना काही महिलांनाही या कामगारांसोबत राहावे लागते. अशा अनेक महिलांचे या काळात शोषण केले जाते.
लैगिंक संबंधांच्या बदल्यात दोन ते तीन ग्रॅम सोनं
याच महिलेने खाण कामगार शरीरसुखासाठी महिलांना काय प्रलोभन देतात आणि महिला त्यांच्या आर्थिक गरजांमुळे त्याला बळी कशा पडतात? याबाबत सांगितलं आहे. खाण कामगारांकडे जेव्हा पैसे असतात, तेव्हाच ते गावामध्ये फिरताना दिसतात. त्यांच्याकडे पैसे खर्च करायला असतील तेव्हा ते गावात येतात. हे कामगार योग्य स्वच्छता पाळत नाही. त्यांना शरीरसंबंधाआधी अंघोळ करण्यासाठी अनेकदा विनवणी करावी लागते. असे काही महिलांनी सांगितले. काही महिलांच्या सांगण्यांनुसार हे कामगार शरीरसंबंधाच्या बदल्यात महिलांना सोनं देतात. सध्या दोन वैशायलये चालवणाऱ्या वर उल्लेख केलेल्या माहिलेने सांगितल्यानुसार तिला शरीरसंबंधाच्या बदल्यात दोन ते तीन ग्रॅम सोने मिळायचे. याच कमाईतून या महिलेने आता स्व:चे घर घेतले आहे. तिला स्वतची एक दुचाकी आहे.
यातून महिलांना बाहेर काढण्याचं आव्हान
या महिलेला आता देहविक्री व्यवसायातून बाहेर पडायचे आहे. तिला आता वकील किंवा आर्किटेक्ट व्हायचे आहे. दरम्यान, या भागात फक्त प्रदूषण ही एकच समस्या नाही. देहविक्री व्यवसायात ढकलल्या गेलेल्या महिलांना यातून बाहेर काढणे, हेदेखील फार मोठे आव्हान आहे.
हेही वाचा :
Pune Crime : पिंपरी- चिंचवडमध्ये 'स्पा'च्या नावाखाली खुलेआम वेश्याव्यवसाय; चार तरुणींची सुटका