लाहोर : पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जमात-उल-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्या घराबाहेर मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात 10 लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. घटनेच्या ठिकाणी पोलीस, रेस्क्यु टीम आणि बॉम्ब विरोधी पथक पोहचलं आहे.  हाफिज सईद हा पाकिस्तानच्या जौहर टाऊन या भागात राहत असून त्याच्या  घरासमोर झालेल्या या स्फोटामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.  


 







प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येतंय की या स्फोटाचा धमाका जबरदस्त होता. यामध्ये एक इमारत कोसळली असून आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. स्फोट झाल्या त्या ठिकाणच्या गाड्यांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. जखमींनी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


 






या स्फोटाच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, एका अज्ञात व्यक्तीने हाफिज सईदच्या घराबाहेर मोटरसायकल लावली होती आणि त्यातूनच धमाका झाला. पोलिसांनी याचा तपास सुरु केला असून या भागाची नाकाबंदी करण्यात आली आहे. 


मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने बेकायदेशीर निधी प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा त्याला ठोठावली आहे. गेल्या वर्षी 17 जुलैला दहशतवादी फंडिंग प्रकरणात हाफिज सईदला अटक करण्यात आली होती.  सईदला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलं असून अमेरिकेने त्याच्यावर 10 कोटी डॉलर्सचे बक्षिसही ठेवले आहे. 


महत्वाच्या बातम्या :