एक्स्प्लोर

Bitcoin : चीनचा दे धक्का! बिटकॉईनने पाच महिन्यातील निचांकी पातळी गाठली, किंमत 22 लाखांवर घसरली

Bitcoin Crash : जगात सर्वाधिक वापरण्यात येणाऱ्या क्रिप्टोकरंसी बिटकॉईनच्या किंमती मंगळवारी घसरल्या असून त्या 30 हजार डॉलरच्या आत म्हणजे 22 लाख रुपयांवर पोहोचल्या आहेत.

Bitcoin Crash : एकेकाळी विक्रमी 50 लाखांवर गेलेली एका बिटकॉईनची किंमत आता 22 लाखांवर आली आहे. बिटकॉईनची ही किंमत गेल्या पाच महिन्यातील निचांकी पातळीवर असून अजून यात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ताज्या माहितीनुसार, एक बिटकाईनची किंमत ही 29,511 डॉलरवर पोहोचली असून 22 जानेवारीनंतर पहिल्यांदाच 30 हजार डॉलरच्या आत म्हणजे जवळपास 22 लाखांवर आली आहे. चीनने आपल्या देशातील क्रिप्टोकरंसीबाबतच्या नियमांत बदल केल्याने बिटकॉईनची किंमत घसरली आहे. 

चीनच्या धोरणात बदल
चीनने आपल्या क्रिप्टोकरंसीच्या नियमांत बदल करुन क्रिप्टोकरंसी मायनिंगच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. त्याचा परिणाम ही बिटकॉईनच्या किंमतीवर झाल्याचं दिसून आलं आहे. चीन ही क्रिप्टोकरंसीचे ट्रेडिंग आणि मायनिंगसाठी सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं सांगितलं जातं. चीनने क्रिप्टोकरंसीच्या धोरणात बदल केल्याने त्याचा फटका बिटकॉईनला बसला आहे. आता याचा परिणाम जगभरातील क्रिप्टोकरंसीच्या व्यवहारांवर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीन नेहमी काही ना काही वेगळी धोरणं राबवून जगाच्या अर्थव्यवस्थेला वेठीस धरतो अशी तक्रार अनेक देश करतात. आता क्रिप्टोकरंसीचे बदललेले धोरण हा त्याचाच भाग असल्याचं सांगण्यात येतंय.  

इलॉन मस्कचीही माघार
सुरुवातीला बिटकॉईनचे समर्थन करणाऱ्या टेस्लाच्या इलॉन मस्क यांनीही गेल्या महिन्यात आपण बिटकॉईन वापरणार नसल्याचं जाहीर केलं होतं. टेस्लाच्या कार खरेदीसाठी आता बिटकॉईनचा वापर करता येणार नाही. टेस्लाने आपल्या कार खरेदीसाठी बिटकॉईनचा पर्याय दिला होता. आता कंपनीने हा निर्णय मागे घेतला असून तशा प्रकारची घोषणा सीईओ इलॉन मस्क यांनी केली आहे. क्रिप्टोकरन्सी ही अनेक स्तरावर वापर करण्याजोगी चांगली कल्पना आहे पण पर्यावरणाच्या ऱ्हासाची किंमत मोजून त्याचा वापर आपण करत नसल्याचं इलॉन मस्क यांनी सांगितलंय. इलॉन मस्क यांच्या बिटकॉईन न स्वीकारण्याच्या या निर्णयानंतर बिटकॉईनच्या किंमती 17 टक्क्यांनी घसरल्या होत्या.

काय आहे बिटकॉइन?
बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंटव्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.

भारतात अद्याप बिटकॉइनच्या व्यवहारांना मंजूरी देण्यात आली नाही.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

US Elections Results 2026: अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव का झाला?; 10 मोठी कारणं समोर
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव का झाला?; 10 मोठी कारणं समोर
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव; भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव; भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, अमेरिकेत काय काय घडलं? LIVE
अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, अमेरिकेत काय काय घडलं? LIVE

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Embed widget