World First SMS Merry Christmas Auctioned : पॅरिसमध्ये मंगळवारी एक लिलाव पार पडला. या लिलावानं अनेकांना थक्क केलं. हा लिलाव एखादी वस्तू, बंगला किंवा कोणत्याही गाडीचा नव्हता, तर हा लिलाव होता जगातील पहिल्या एसएमएसचा. हा टेक्स्ट मेजेस तब्बल एक लाख 21 हजार डॉलर्सना विकण्यात आला. याची किंमत भारतीय चलनात पाहायची झाली, तर हा मेसेज लिलावात तब्बल 1 कोटी रुपयांना विकण्यात आला.
आजपासून जवळपास 30 वर्षांपूर्वी कम्युनिकेशन जगतात एक नवा प्रयोग करत वोडाफोनचे इंजिनियर नील पैपवर्थ यांनी आपले सहयोगी रिचर्ड जार्विस यांना एक टेक्स्ट मेसेज पाठवला होता. हा एसएमएस पहिल्यांदा 3 डिसेंबर 1992 मध्ये पाठवण्यात आला होता. नील पैपवर्थ यांनी या एसएमएसला आपल्या कंप्युटरमधून युनायटेड किंग्डममधील आपल्या सहकाऱ्याला पाठवला होता. हा मेसेज त्यांच्या सहकाऱ्याला "Orbitel 901" या हँडसेटवर मिळाला होता. लिलावाचं आयोजन Aguttes ऑक्शन हाऊसच्या वतीनं करण्यात आलं होतं.
जगातला पहिला टेक्स्ट मेसेज हा व्होडाफोन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला होता. व्होडाफोनच्या कर्मचाऱ्याने 3 डिसेंबर 1992 रोजी हा टेक्स्ट मेसेज केला असून तो 'मेरी ख्रिस्मस' (Merry Christmas) असा होता. या मेसेजमध्ये 14 अक्षरे होती. नील पापवर्थ या कर्मचाऱ्याने न्यूबेरी बर्कशायरमधील रिचर्ड जार्व्हिसला हा पहिला मेसेज केला होता. व्होडाफोन कंपनीकडून शॉर्ट मेसेज सर्व्हिस म्हणजे एसएमएस सेवावर काम सुरु होतं. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रयोग करण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या वर्षी नोकीया कंपनीने एसएमएस फीचरची सुविधा उपलब्ध करुन दिली आणि त्यानंतरचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे.
आता या मेसेजचा लिलाव काल (मंगळवारी) म्हणजेच, 21 डिसेंबरला फ्रान्समधील ऑगटर्स ऑक्शन हाऊस या ठिकाणी पार पडला. यातून जे काही पैसे मिळतील ते संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स रिफ्युजी एजन्सी (United Nations Refugee Agency- UNRA)ला देण्यात येणार आहेत. या मेसेजला लिलावासाठी 1 कोटी 71 लाख रुपयांची किमान मर्यादा ठेवण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला या मेसेजच्या सेंडर आणि रिसिव्हरची एक डिजिटल फाइल देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Dubai: कागदाचा वापर 100 टक्के बंद, दुबई जगातील पहिले पेपरलेस शहर
- Trending : पठ्ठ्यानं दाखवल्या गुगलमधील चुका, जिकलं लाखोंचं बक्षीस
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह