Bernard Arnault : लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रॅन्ड लुईस विटनचा मालक बर्नार्ड अॅरनॉल्टने आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. फोर्ब्जने रियल टाईम बिलिनियर्स लिस्ट जाहीर केली असून त्यामध्ये बर्नार्ड अॅरनॉल्टने अॅमेझॉनच्या जेफ बेझोस आणि टेस्लाच्या इलॉन मस्कला मागे टाकत हे स्थान पटकावलं आहे. 


फ्रान्सच्या LVMH या उद्योग समूहाचा संस्थापक असलेल्या बर्नार्ड अॅरनॉल्टची संपत्ती आता 198.9 अब्ज डॉलर्स इतकी असून जेफ बेझोस या यादीत 194.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर इलॉन मस्कचा नंबर लागत असून त्याची संपत्ती ही 185.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. गेल्या आठवड्यात अमेझॉनच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची घट झाली. जेफ बेझोस याने एकाच दिवसात जवळपास 14 अब्ज डॉलरची संपत्ती गमावली होती.  त्याचा फायदा बर्नार्ड अॅरनॉल्टला झाला असून तो थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला. 


बर्नार्ड अॅरनॉल्ट यांनी 1984 साली लग्जरी गुड्स मार्केटमध्ये पाऊल टाकलं होतं. कोरोनाच्या काळात बर्नार्ड अॅरनॉल्टच्या लुईस विटन या लग्जरी ब्रॅन्डचा खप मोठ्या प्रमाणात झाला आहे. या काळात बर्नार्ड अॅरनॉल्टच्या कंपनीचा महसूल हा 17.4 अब्ज डॉलर्सनी वाढला. कोरोनाच्या पूर्व काळाशी तुलना करता ही वाढ 14 टक्क्याहून अधिक आहे. 


 






महत्वाच्या बातम्या :