Russia Ukraine War : सौदी अरेबियाला (Saudi Arabia) मागे टाकत रशिया (Russia) चीनचा (China) सर्वात मोठा तेल पुरवठादार (Supplier) बनला आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे मॉस्कोने (Moscow) बीजिंगला (Beijing) सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची विक्री केली आहे. यामुळे चीनचा रशियन तेल आयातीचा  (Import) दर वाढून 55 टक्क्यांसह विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. सौदी अरेबियाला मागे टाकत आता रशिया चीनला सर्वाधिक तेल पुरवठा (Provider) करणारा देश बनला आहे.


कोरोनाच्या निर्बंधांमुळे आणि अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे मागणी कमी होऊनही चीनने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली आहे. सरकारी रिफायनिंग कंपनी सिनोपेक आणि सरकारी झेनहुआ ​​ऑइलसह चिनी कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये रशियन कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे. युरोपिय देश आणि अमेरिकेने रशियाकडील तेल खरेदीवर निर्बंध लादले आहेत.


गेल्या महिन्यात जवळपास इतकी आयात झाली
चीनच्या सीमाशुल्क सामान्य प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये गेल्या महिन्यात सुमारे 8.42 दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात झाली होती. यामध्ये पूर्व सायबेरिया पॅसिफिक महासागर पाईपलाईनद्वारे केला जाणारा पुरवठा आणि समुद्रमार्गे आयात करण्यात आली. यामुळे, चीनचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा स्त्रोत असलेला सौदी अरेबिया आता 7.82 दशलक्ष टनांसह दुसऱ्या स्थानावर आहे.


अमेरिका-ब्रिटनकडून रशियन तेलावर बंदी
मार्चमध्ये रशियावर लादलेले निर्बंध आणखी वाढवत अमेरिका (US) आणि ब्रिटनने (UK) रशियन तेलावर बंदी घातली आहे. तर युरोपिय संघाने रशियन गॅसवर निर्बंध लादले आहेत. यावेळी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितलं की या निर्णयामुळे रशियाच्या अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: