Elon Musk's Transgender Daughter : टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. मस्क आता पुन्हा चर्चेत आले आहेत, मात्र यामागचं कारण त्यांची मुलगी आहे. एलॉन मस्क यांच्या ट्रान्सजेंडर मुलीनं त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. मस्क यांच्या मुलीनं आडनाव बदलण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्याला वडिलांचं नाव नको आहे, त्यामुळे तिनं न्यायालयात नाव बदललण्यासाठी याचिक दाखल केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मस्क यांच्या मुलीचं नाव झेवियर अलेक्झांडर मस्क (Xavier Alexander Musk) असं आहे. ती ट्रान्सजेंडर असून तिच्या आईचं नाव जस्टिन विल्सन (Justin Wilson) आहे. मस्क आणि जस्टिन यांची मुलगी झेवियर नुकतीच 18 वर्षांची झाली आहे. तिनं दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, 'मी माझ्या जन्मदात्या वडिलांसोबत (Biological Father) राहत नाही आणि मला त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवण्याची इच्छा नाही.' त्यामुळे तिनं  याचिकेत नाव बदलण्याची विनंती केली आहे.


झेवियरने एप्रिलमध्ये लॉस एंजेलिस काउंटी सुपीरियर कोर्टात नाव बदलण्यासाठी आणि आपल्या नवीन ओळख पत्रासाठी याचिका दाखल केली. अलीकडेच ही बाब समोर आली आहे. या संदर्भात एलॉन मस्क आणि त्यांच्या मुलीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही. सध्या एलॉन मस्क ट्विटरसोबतच्या डीलमुळे चर्चेत आहे.


जेवियरची आई 2008 मध्ये एलॉनपासून विभक्त
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलॉन मस्कची ट्रान्सजेंडर मुलगी झेवियर अलीकडेच तिच्या वडिलांपासून वेगळी झाली आहे. ती नुकतीच 18 वर्षांची झाली. ज्यानंतर तिनं आता कोर्टाला लिंग बदलानुसार नवीन ओळख आणि नाव बदलण्याची विनंती केली आहे. झेवियरच्या विनंतीनुसार, तिचं ऑनलाइन दस्तऐवजामध्ये तिचं नवीन नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. तिची आई जस्टिन विल्सनने एलॉन मस्कपासून 2008 मध्ये घटस्फोट घेतला.


महत्त्वाच्या इतर बातम्या