Staff Cut Newborn's Head in Pakistan : पाकिस्तानामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वैद्यकीय कर्मचार्याने एका हिंदू महिलेच्या गर्भातील बाळाचं डोकं कापून ते गर्भाशयात सोडलं. ही अतिशय धक्कादायक घटना आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा हा निष्काळजीपणा महिलेल्या जीवाला धोका निर्माण झाला. यामुळे 32 वर्षीय हिंदू महिलेचा जीव धोक्यात आला. सिंध सरकारने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान या प्रकरणी आता सिंध सरकार आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
जामशोरो येथील लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल अँड हेल्थ सायन्सेस (LUMHS) मधील स्त्रीरोग विभागाचे प्रमुख प्रोफेसर राहिल सिकंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'थारपारकर जिल्ह्यातील एका दुर्गम गावात राहणारी एक हिंदू महिला तिच्या परिसरातील ग्रामीण आरोग्य केंद्रात (RHC) गेली, परंतु तेथे स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नव्हता. त्यावेळी केंद्रात उपस्थित असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिच्यावर उपचार सुरू केले.
मात्र यावेळी कर्मचाऱ्यांकडून मोठा निष्काळजीपणा झाल्याचं समोर आलं आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्याने शस्त्रक्रियेदरम्यान अर्भकाचं शीर कापलं आणि ते गर्भाशयातच सोडलं. सिकंदर यांनी पुढे सांगितलं की, रविवारी येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी महिलेवर शस्त्रक्रिया सुरु केली, यावेळी कर्मचाऱ्यांनी गर्भातील बाळाचा शीरच्छेद करत ते शीर गर्भातच सोडलं. यामुळे नंतर महिलेची प्रकृती खालावली.
महिलेची प्रकृती फारच चिंताजनक होती. महिलेला जवळच्याच मीठी येथील रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तेथेही पुरेशी व्यवस्था नसल्याने अखेर महिलेला LUMHS रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे महिलेवर शस्त्रक्रिया करुन गर्भातील बाळाचं डोकं बाहेर काढण्यात आलं.
प्रोफेसर सिकंदर यांनी सांगितलं की, 'मुलाचे डोकं आईच्या गर्भाशयात अडकलं होतं. महिलेच्या गर्भाशयावरही जखमा होत्या. महिलेचा जीव वाचवण्यासाठी ऑपरेशन करून बाळाचे डोकं बाहेर काढण्यात आलं, यामुळे महिलेचा जीव वाचला. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सिंधच्या आरोग्य सेवेवर प्रश्न उपस्थित झालं आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ. जुमन बाहोतो यांना या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.