न्यूझीलंड : एका ऑस्ट्रेलियन जोडप्याचा कुत्रा न्यूझीलंडमध्ये (New Zeland) अडकला आहे. कुत्र्याला त्यांना ख्रिसमससाठी घरी आणायचे आहे, मात्र कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे ख्रिसमस साजराच्या करण्यासाठी न्यूझीलंडमधून आपल्या कुत्र्याला घरी नेण्यासाठी खाजगी जेट भाड्याने देण्यासाठी हे जोडपे हजारो डॉलर्स खर्च करण्यास तयार झाले आहे. मुंचकिन असे या कुत्र्याचे नाव असून त्याला इंडोनेशियातील बाली येथून दत्तक घेतले होते. मात्र कुत्र्याला त्याच्या मालकासह न्यूझीलंडहून प्रवास करता आला नाही. या जोडप्याचे घर ऑस्ट्रेलियाच्या सनशाईन कोस्टमध्ये आहे जेथे विमान सेवा बंद आहे.


कुत्र्याची मालकीण टॅश कॉर्बन यांनी सांगितले की, "ती पाच महिन्यांपासून मुंचकिन आणि त्यांची होणारा पती डेव्हिड डायनेस यांच्यापासून दूर आहेत. मुचकिलाना आणण्यासाठी त्यांनी US$ 32,000 मध्ये खाजगी जेट भाड्याने घेण्याचे ठरवले. पैशाने काही फरक पडत नाही. ख्रिसमसआधी मुंचकिनला घरी आणायचं आहे.''  टॅश कॉर्बन म्हणाल्या की, ''ख्रिसमस आमच्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे या निमित्ताने आम्ही एकत्र राहावे अशी माझी इच्छा आहे.''


कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट आढळल्यानंतर न्यूझीलंडचे दक्षिण बेट आणि सनशाईन कोस्टजवळील विमानतळांदरम्यान काही उड्डाणे सुरू आहेत. डेव्हिड डायनेस न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडमध्ये आहे जिथे कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये परतल्यावर डेव्हिड यांना दोन आठवडे विलगीकरणात राहावं लागणार आहे.


या जोडप्याने खासगी जेटमधील इतर चार जागा प्रवाशांना विकून त्यांचा अर्धा हिस्सा देण्याची ऑफर दिली आहे. किंवा इतर कोणत्याही खाजगी चार्टर्डवर प्रवाशांसोबत खर्च वाटून घेण्याची योजना आहे. जर ही योजना यशस्वी झाली तर नाताळच्या आधी 'मंचकिन'ला ऑस्ट्रेलियात आणता येईल.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha