Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 8 हजार 503 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे एकूण 23 रुग्ण समोर आले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय? 


आतापर्यंत 4 लाख 74 हजार 735 रुग्णांचा मृत्यू 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 94 हजार 943 आहे. अशातच या महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 74 हजार झाली आहे. आकडेवारीनुसार, काल (गुरुवारी) 7678 कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 5 हजार 66 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 







आतापर्यंत 131 कोटींहून अधिक लसीचे डोस 


राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे 131 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल (गुरुवारी) 74 लाख 57 हजार 970 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत लसीचे 131 कोटी 18 लाख 87 हजार 257 डोस देण्यात आले आहेत. 


राजस्थानमधील सर्व 9 ओमायक्रॉन बाधित निगेटिव्ह


देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचे 23 रुग्ण आढळून आले आहेत. राजस्थानतील (Rajsthan) जयपूर (Jaipur) मध्ये कोरोना (Corona) च्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) नवीन प्रकारातील सर्व 9 पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राजस्थानच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांना आरयूएचएस (RUHS) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासोबतच त्यांना सात दिवस विलगीकरणामध्ये (Quarantine) राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे.


देशात 5 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये नऊ जणांना कोरोना विषाणूच्या 'ओमायक्रॉन' या नवीन प्रकाराची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. यापैकी चार जण दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि पाच जण त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ''दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या कुटुंबासह त्यांच्या संपर्कात आलेल्या 34 लोकांचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी नऊ जणांना ओमाक्रॉनची लागण झाली, तर 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.''


ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण 2 डिसेंबरला कर्नाटकात सापडला होता. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 23 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांची संख्या सर्वाधिक 10 आहे. जागतिक स्तरावर, ओमायक्रॉन व्हेरियंटचे  2, 303 रुग्ण सापडले आहेत.


राज्यात गुरुवारी 789 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर सात जणांचा मृत्यू


कोरोनाबाधितांच्या  (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (गुरुवारी)  789 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 585  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 66 लाख 41  हजार 677 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. काल एकाही ओमायक्रॉन  रुग्णाची राज्यात नोंद झाले आहे. राज्यात सध्या 10 ओमायक्रॉन रुग्णांवर उपचार सुरू आहेत 
 
राज्यात काल (गुरुवारी) सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 482 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 74 हजार 353 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 887  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 65 , 17, 323 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईत काल 218 रुग्णांची भर तर एकाचा मृत्यू


गेल्या 24 तासात मुंबईत 218 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 103 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 1765 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,43,966 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 1765 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.02 टक्के इतका झाला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pfizer Vaccine : Omicron वर Pfizer लस किती प्रभावी? अभ्यासात माहिती उघड


देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह