Omicron Variant : राजस्थानतील (Rajsthan) जयपूर (Jaipur) मध्ये कोरोना (Corona) च्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) नवीन प्रकारातील सर्व 9 पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राजस्थानच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांना आरयूएचएस (RUHS) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासोबतच त्यांना सात दिवस विलगीकरणामध्ये (Quarantine) राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे.


देशात 5 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये नऊ जणांना कोरोना विषाणूच्या 'ओमायक्रॉन' या नवीन प्रकाराची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. यापैकी चार जण दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि पाच जण त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ''दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या कुटुंबासह त्यांच्या संपर्कात आलेल्या 34 लोकांचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी नऊ जणांना ओमाक्रॉनची लागण झाली, तर 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.''


ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण 2 डिसेंबरला कर्नाटकात सापडला होता. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 23 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांची संख्या सर्वाधिक 10 आहे. जागतिक स्तरावर, ओमायक्रॉन व्हेरियंटचे  2, 303 रुग्ण सापडले आहेत.


दरम्यान, डीजीसीएने (DGCA) गुरुवारी सांगण्यात आले आहे की, भारतातील आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे (International Flight) 31 जानेवारी 2022 पर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. डीजीसीएने 1 डिसेंबर रोजी ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर 15 डिसेंबरपासून नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरु न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधीच आठवडाभरापूर्वी नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पूर्ववत सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा स्थगित करण्यात आली आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha