Telegram New Features : टेलिग्राम (Telegram) या मेसेजिंग अ‍ॅपची (Messaging App) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसून येते आहे. या अ‍ॅपमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात नवीन वापरकर्त्यांची (Users) भर पडली. टेलिग्राम कंपनी स्वतःला शर्यतीत कायम ठेवण्यासाठी सतत अनेक बदल आणि नवीन फिचर्स (Features) आणत आहे. या अ‍ॅपमध्ये असे अनेक फिचर्स आहेत जी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) मिळत नाहीत. अलीकडेच, कंपनीने अपडेटसह अ‍ॅपमध्ये आणखी अनेक नवे फिचर्स जोडले आहेत. हे नवे फिचर्स व्हॉट्सअ‍ॅपमध्येही जोडावेत, असे अनेक युजर्सने म्हटले आहे. चला जाणून घेऊया ती वैशिष्ट्ये कोणती आहेत.


1. ग्रुपवरील माहिती शेअर करणे थांबवण्याचा पर्याय
टेलीग्रामने आपल्या नवीन अपडेटमध्ये युजर्सना एक अप्रतिम फीचर दिले आहे. यामध्ये, ग्रुप अ‍ॅडमिन किंवा चॅनल त्याचा माहिती, कंटेंट बाहेर शेअर करण्यापासून रोखू शकतो. हे सेटिंग चालू केल्यानंतर, ग्रुपमधील कोणी युजर ग्रुप किंवा चॅनलवरील कंटेटचा स्क्रीनशॉट, फोटो आणि इतर मीडिया फाईल्स कोणालाही फॉरवर्ड करु शकणार नाही.


2. तारखेनुसार मेसेज डिलिट करण्याचा पर्याय
टेलिग्राममध्ये आता तुम्हांला तारखेनुसार मेसेज डिलिट करता येणार आहेत. हे वैयक्तिक चॅटसाठी आहे. याद्वारे तुम्ही तारीख निवडून मेसेज (Message) चॅट इतिहास (Chat History) सहजपणे हटवू शकता.


3. लॅपटॉप आणि संगणकावर वापरण्याचा पर्याय
कंपनीचे हे फीचर युजर्सच्या पसंतीस उतरत ​​आहे. या फिचरमुळे आता तुम्ही काही सेकंदात लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर टेलिग्राम चालवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त QR कोड स्कॅन करावा लागेल. याशिवाय, जर तुम्ही 1 आठवडा ते 6 महिने कोणत्याही डिव्हाईसवर सक्रिय नसाल तर ते स्वयंचलितपणे लॉग आऊट होईल.


4. ग्रुपमध्ये चॅनेल म्हणून पोस्ट करण्याचा पर्याय
आता टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये तुम्ही चॅनेल म्हणून सहजपणे पोस्ट करू शकता. याशिवाय, तुम्हांला कॉलद्वारे लॉगिन करण्याचा पर्याय देखील मिळेल. यामध्ये तुम्हांला तुमच्या कॉलिंग नंबरचे शेवटचे काही अंक व्हेरिफिकेशन कोड म्हणून वापरावे लागतील.


5. याधीचे फिचर्सही उत्कृष्ट
आताच्या नवीन फिचर्ससह टेलिग्रामचे याआधीचे फिचर्सही उत्तम आहे. जी व्हॉट्सएपवरही उपलब्ध नाहीत. यामध्ये लाईव्ह स्ट्रिम (Live Strem), स्क्रीन शेयरिंग (Screen Sharing), अनलिमिटेड वॉईस चॅट (Unlimited Voice Chat) आणि ऑटो डिलीटिंग मॅसेज (Auto Deleting Message) या उत्कृष्ट फिचर्सचा समावेश आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha