लंडन : जगभरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यूकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य नियामक मंडळाच्या शिफारशीनंतर ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाला पुन्हा आपल्या लसीची चाचणी सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मागील आठवड्यात लस टोचलेला एक स्वयंसेवक आजार पडल्याने लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर भारतातील सीरम इन्स्टिट्यूटलाही चाचण्या थाबवण्यास सांगितले होते.
ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोरोनावरील लस तिच्या मानवी चाचणीच्या टप्प्यात होती. अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लशीच्या मानवी चाचणीत सामील असलेला एक व्यक्ती आजारी पडला होता. त्यामुळे या लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. अॅस्ट्राझेनेकाने एक निवेदन जारी करत याबाबतची माहिती दिली होती.
या लसीला एझेडडी -1222 (AZD1222)असे नाव देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगातील इतर लसींच्या चाचण्यांच्या तुलनेत ही लस आघाडीवर आहे. सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात हजारो स्वयंसेवकांचा सहभाग आहे.
रुग्णाच्या आजाराच्या कारणांचा शोध सुरु
अॅस्ट्राझेनेकाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही सामान्य प्रक्रिया आहे. आता रुग्णाच्या आजाराच्या कारणांचा शोध घेतला जाईल जेणेकरुन चाचणीची विश्वासार्हता कायम राहिल. मोठ्या प्रमाणावर चाचणी होत असल्यास स्वयंसेवक आजारी पडण्याची शक्यता असते. पण याचा स्वतंत्ररित्या सतर्कतेने तपास होणं गरजेचं आहे. आम्ही याचा शोध घेत आहोत, जेणेकरुन चाचणीच्या मुदतीवर याचा परिणाम होऊ नये." ऑक्सफर्डच्या लसीत दुसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान स्वयंसेवकांमध्ये अँटीबॉडी विकसित होत असल्याचं समोर आलं होतं.
ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांना ChAdOx1 nCoV-19 लसीच्या यशाबाबत खात्री आहे. शिवाय त्यांना 80 टक्के विश्वास आहे की ही लस सप्टेंबरमध्ये उपलब्ध होईल. ऑक्सफर्डच्या लसीचं उत्पादन AstraZeneca ही कंपनी करणार आहे. ही लस ChAdOx1 व्हायरसपासून बनली आहे, जो सामान्य सर्दी निर्माण करणाऱ्या विषाणूचा कमकुवत स्वरुप आहे. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरुन मानवी शरीराला त्याचा संसर्ग होणार नाही.
Corona Vaccine | कोरोना लसीवरील संशोधनाला भारतातही ब्रेक, सीरम इन्स्टिट्यूटने चाचणी थांबवली