Italy : मिलानमधील एका शॉपिंग सेंटरमध्ये आर्सेनलचा फुटबॉलपटू पाब्लो मारीसह (Pablo Mari) पाच जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. तर चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजता मिलानोफिओरी दि असागो शॉपिंग सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला असून चेंगराचेंगरी झाल्याचे समजते. 


 






चार जणांची प्रकृती चिंताजनक
फुटबॉलपटू मेरीची प्रकृती ठीक आहे. मात्र चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण सहा जणांवर हल्ला झाल्याचे समजते.


अज्ञात व्यक्तीकडून लोकांना चाकूने मारहाण
एका रिपोर्टनुसार, 46 वर्षीय व्यक्तीने दुकानात प्रवेश केला, कपाटातून चाकू घेतला आणि लोकांना चाकूने मारहाण करण्यास सुरुवात केली. ग्राहकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका व्यक्तीने सुपरमार्केट कॅरेफोरमधून चाकू घेतला आणि त्यानंतर त्याने ग्राहकांवर हल्ला केला. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्लेखोराने हल्ला केला, तेव्हा एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. सुरुवातीला आम्हाला काहीच समजले नाही. त्यानंतर काही वेळाने शॉपिंग सेंटरमध्ये एक व्यक्ती चाकूने हल्ला करत असल्याचे समजले. हे ऐकून आम्ही सगळे घाबरलो. 


फुटबॉलपटू मेरीची प्रकृती ठीक


आर्सेनलने फुटबॉलपटू पाब्लो मारीवरील हल्ल्यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले की पाब्लोच्या सहकाऱ्यांशी बोललो आहोत. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पाब्लो आणि त्या भीषण घटनेतील इतर पीडितांसाठी आम्ही शोक व्यक्त करतो.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Todays Headline 28 october : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या