Zimbabwe Cricket Fans Celebration: टी 20 विश्वचषकात झिम्बावेनं पाकिस्तानचा पराभव करत मोठा उलटफेर केला आहे. अटीतटीच्या लढतीत झिम्बावेच्या संघानं पाकिस्तानवर एका धावेनं विजय मिळवला. पाकिस्तानसारख्या बलाढ्या संघाचा पराभव केल्यामुळे झिम्बावेच्या संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. पाकिस्तानविरोधात थरारक विजय मिळवल्यानंतर झिम्बावेच्या संघातील खेळाडू आणि चाहत्यांचा आनंद गगणात मावत नव्हता. विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंनी जल्लोष केला. झिम्बावेच्या खेळाडूच्या जल्लोष करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


झिम्बावेच्या काही खेळाडूंनी विजयाचा आनंद सोशल मीडियावरही व्यक्त केला आहे. त्याशिवाय झिम्बावेचे राष्ट्रअध्यक्षांनाही ट्वीट करत संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. झिम्बावेच्या विजयानंतर झिम्बावेच्या चाहत्यांच्या आनंद गगणात मावत नव्हता. सामना संपल्यानंतर खेळाडूंसह चाहतेही आनंदात होते. चाहत्यांनी स्टेडिअममध्ये डान्स सुरु केला होता. 




पहिल्यांदात सुपर 12 मध्ये 
झिम्बावेच्या संघाने टी 20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सुपर 12 मध्ये स्थान पटकावलं आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानसारख्या बलाढ्या संघाचा पराभव करत विश्वचषकात उलटफेर केला आहे. 2007 मध्ये झिम्बावेच्या संघानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर 15 वर्षानंतर पुन्हा एकदा झिम्बावेच्या संघानं बलाढ्य संघाचा पराभव करत विश्वचषकात उलटफेर केला आहे. 






सामन्याचा लेखाजोखा -
नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  झिम्बाब्वेच्या संघानं निर्धारित 20 षटकात आठ विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 131 धावांचं लक्ष्य ठेवलं. झिम्बाब्वेकडून सेन विल्यम्सनं सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनिअर उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यानं या सामन्यातील चार षटकात 24 धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर शादाब खाननं तीन विकेट्स घेतल्या. तर,हारिफ रौफच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली.  131 धावांचं लक्ष्य रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले. बाबर आझम आणि रिझवान लवकर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्वतःला सावरू शकला नाही. अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना पाकिस्तानच्या संघाला अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवामुळं पाकिस्तानची टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता वाढलीय.