अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर लोकांमध्ये भीती आहे. तिथले लोक इतर देशांमध्ये पलायन करु जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे त्या देशातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे देशामध्ये एकच हलकल्लोळ उडाला आहे. देशातील नागरिक आता मदतीसाठी जगातील इतर देशांकडे मोठ्या आशेने बघत आहेत. अशा परिस्थितीत  हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री अँजेलिना जोली तेथील परिस्थिती एका पत्राद्वारे मांडली आहे. अभिनेत्रीनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले आहे. अँजेलिनाने आवाहन केल्यानंतर तब्बल 4.5 Million चाहत्यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.


हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री अँजेलिना जोलीने  शनिवारी इन्स्टाग्रामवर एन्ट्री  आली. 46 वर्षीय अभिनेत्रीने सांगितले की, "सोशल मीडीयाच्या माध्यमातून जगातील ज्या लोकांवर अन्याय झाला आहे, त्यांच्यासाठी वापर करणार आहे". अँजेलिना या पूर्वीच समाजकार्य करीत असल्याने जगभर त्यासाठीही ओळखली जात होती. 


इन्स्टाग्रामवर आल्यानंतर अँजेलिना जोलीने  तालिबान शासीत अफगाणिस्तानातील एक मुलीने लिहिलेले पत्र शेअर केले आहे. या पत्रात अफगाणी मुलीने आपल्या भावना व्यक्त केल्या असून तालिबान सत्तेत आल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे देखील म्हटले आहे. पत्रात मुलीने लिहिले की, "20 वर्षानंतर पुन्हा आमच्याकडे अधिकार नाहीत. आमचे आयुष्य अंधारात आहे. आज आम्ही पुन्हा आमचे स्वातंत्र्य गमावले असून पुन्हा आम्ही कैदी झालो आहे". 






इन्स्टाग्रामवर हे लेटर शेअर करताना अँजेलिना म्हणाली, हे पत्र मला एका अफगाणी मुलीने पाठवले आहे. सध्या अफगाणिस्तानातील नागरिकांच्या सोशल मीडियावरील वापरावर बंदी आणली आहे, त्यामुळे त्यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाही. यामुळे मी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आली आहे. जे आपल्या मानवी अधिकारांसाठी सध्या लढत आहे.


"मी जेव्हा 2011 साली अफगाणिस्तानातील सीमेवर होते. तेव्हा माझी भेट अफगाण रिफ्युजीसोबत झाली होती. जे तालिबानचा एक हिस्सा होते. ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अफगाणिस्तानातील सध्याचे चित्र हे अत्यंत वेदनादायी आहे", असे म्हणाली.


संबंधित बातम्या :