आंध्र प्रदेशच्या जान्हवी दांगेती या मुलीने भारताचा मान जागतिक स्तरावर उंचावला आहे. जान्हवीने देशाला अभिमान वाटवा अशी कामगिरी केली आहे. आंध्र प्रदेशातील जान्हवी दांगेती या तरुणीने नुकतेच अमेरिकेतील अलाबामा येथील केनेडी स्पेस सेंटरमध्ये NASA चा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम (IASP) अभ्यासक्रम पूर्ण केला असून, ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय बनली आहे. 


या कोर्ससाठी जगभरातील केवळ 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. जगभरातील 16 लोकांचा समावेश असलेल्या 'टीम केनेडी' (Team Kennedy) साठी 'मिशन डायरेक्टर' (Mission Director) म्हणूनही तिची नियुक्ती करण्यात आली, जिथे तिने अनेक 16 देशांमधील लोकांच्या गटाचे नेतृत्व केले. तसेच तिने सूक्ष्म रॉकेट प्रक्षेपण यशस्वीपणे केले.






                 


IASP फ्लाईट-ओरिएंटेड, सिस्टम-स्तरीय संशोधन आणि तंत्रज्ञानाचा विकास करते. ज्यामुळे प्रगत वैमानिक तंत्रज्ञान प्रभावीपणे परिपक्व होण्यासाठी आणि भविष्यातील हवाई वाहने आणि ऑपरेशनल सिस्टममध्ये संक्रमण होते. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शून्य गुरुत्वाकर्षण, पाण्याखालील रॉकेट प्रक्षेपण, विमान हाताळणी, बहु-प्रवेश प्रशिक्षण, आणि अंतराळासंबंधीत अन्य तंत्रज्ञानाचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले.


जान्हवी आंध्र प्रदेशच्या पलाकोल्लू येथील अभियांत्रिकी शाखेत द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती अवघ्या 19 वर्षांची आहे. जान्हवीने अमेरिकेतील अलाबामा येथील नासा लॉन्च ऑपरेशन्सच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ अभ्यासक्रम (IASP) पूर्ण करणारी एकमेव भारतीय होण्याचा मान मिळवला आहे.


जान्हवीने प्रतिक्रिया देताना सांगितले की, ''मंगळ ग्रहावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या भारतीयांपैकी एक होण्याचे तिचे स्वप्न आहे.''


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha