Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमी तिच्या फिटनेस आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. मलायकाच्या प्रत्येक लूकच्या फोटोंचा सोशल मीडियावर व्हायरल होतो. मात्र यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण काहीस वेगळं आहे. मलायका अरोरा तिच्या हाय हिल्समुळे चर्चेत आली आहे. याच कारण म्हणजे मलायकाचा हाय हिल्समुळे तोल गेला मात्र ती पडता पडता वाचली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
मलायका अरोरा (Malaika Arora) नुकतीच तिची बेस्ट फ्रेंड आणि अभिनेत्री करिश्मा कपूरच्या (Karisma Kapoor) घरी ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी पोहोचली. यावेळी मलायका अरोरा शॉर्ट ड्रेस आणि हाय हिल्समध्ये दिसली. मलायका गाडीतून खाली उतरताच तिच्या हाय हिल्समुळे तोल बिघडला आणि ती पडता पडता थोडक्यात बचावली. यादरम्यान बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही (Arjun Kapoor) तिच्यासोबत होता पण तो मलायकापासून काही अंतरावर होता, त्यामुळे तोही तिला सांभाळू शकला नाही.
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की मलायका अरोराने यावेळी अतिशय हुशारीने स्वत:ला सांभाळले. यानंतर ती पापाराझीसाठी पोझ न देता घाईत निघून गेली. यावेळी मलायकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.
या पार्टीत मलायका अरोराही अतिशय हॉट स्टाईलमध्ये पोहोचली होती. मलायकाने हिरव्या रंगाचा डीप नेक ब्रॅलेट घातला होता आणि हिरव्या शॉर्ट्ससह पेअर केला होता. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही दिसला.
महत्त्वाच्या बातम्या :
- विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझं हलकं होणार, NCERT राबवणार नवी योजना
- ना हात, ना पाय... दिव्यांग रिक्षाचालक पाहून आनंद महिंद्रा अवाक्, दिली 'ही' ऑफर
- Health Tips : नाश्त्यामध्ये खा लापशी, शरीरात दिवसभर राहील ऊर्जा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha