Viral Auto Driver : उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंवर त्यांची करडी नजर असते. असाच एक व्हायरल व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हात आणि पाय नसलेली दिव्यांग व्यक्ती मॉडिफाईड रिक्षा (Modified Rickshaw) चालवताना दिसत आहे. आनंद महिंद्रा या व्हिडिओने खूप प्रभावित झाले आहेत.


उद्योगपती महिंद्रा यांनी म्हटले आहे की, ''हा व्हिडिओ पाहून आपण अवाक झालो आहोत. हे गृहस्थ शारीरिक आव्हानांना तोंड देत आहेत, परंतु निसर्गाने त्यांला जे काही दिले त्याबद्दल ते आनंदी आणि कृतज्ञ आहेत.'' आनंद महिंद्राने या व्यक्तीला नोकरीची ऑफर दिली आहे. या व्यक्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी लोकांना मदत करण्यास सांगितले आहे.






 


1 मिनिट 7 सेकंदांचा हा व्हिडिओ प्रोत्साहित करणार आहे. व्हिडीओमध्ये हात, पाय नसलेला हा माणूस आपली मॉडिफाईड रिक्षा रस्त्यांवर मोठ्या आत्मविश्वासाने चालवत आहे. या व्यक्तीचे रिक्षा चालवताना इतरांशी संभाषण सुरु आहे. आजूबाजू्च्या लोकांचे आवाज ऐकून आणि वाहनांची हालचाल पाहून असे वाटते की, ही व्यक्ती दिल्लीतच आपली रिक्षा चालवत असल्याचे दिसते.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha