शांघाई : माणसाचा सर्वात जवळचा मित्र म्हणून ओळखला जाणारा प्राणी म्हणजे कुत्रा (Dog). अनेकजणांना कुत्रा पाळायला आवडतं आपल्या लाडक्या कुत्र्याची काळजी घेण्यासाठी काहीजण खास माणसं देखील नेमत असल्याचं आपण पाहिलं आहे. पण चीनमधील (China) एका महिलेने तर तिच्या लाडक्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा (Womens Celebrates Dogs Birthday) करताना लाखो रुपये खर्च केले आहेत. या वाढदिवसाचाचे व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर (Social Media) व्हायरल होत असून यातील महिलेने केलेला खर्च पाहून सर्वचजण हैराण होत आहेत. 


डेली स्टार या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या हुनाना प्रातांतील एका महिलेने तिच्या डाउ डाउ (Dau Dau) नावाच्या कुत्र्याचा जंगी वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी संबधित महिलेने तब्बल 11 लाख रुपये खर्च केले असून यावेळी ड्रोन शो हे खास आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. या ड्रोन शोसाठी तब्बल 520 ड्रोन वापरण्यात आले होते. या ड्रोन्सच्या मदतीने आकाशात डाउला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. यावेळी ‘Dou Dou: a very happy birthday’ असं लिहिलं गेलं होतं. ड्रोन भाड्याने देणाऱ्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 30 मिनिटांच्या जवळपास ड्रोन शो यावेळी आयोजीत करण्यात आला होता. दरम्यान या सर्वाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Virat Video) झाला आहे. 


इतर बातम्या :



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live