Viral News : आजकाल लोक सोप्या मार्गाने पैसे कमवण्याची हौसेमुळे अनेकांना तुरुंगाची हवा खायला लागते. कमी वेळात जास्त पैसे मिळवण्यासाठी अनेकजण चुकीचा मार्ग निवडून अवैध तस्करी करतात. नुकतेच सोन्याच्या तस्करीचे एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीला शेव्हिंग ट्रिमरमध्ये (Shaving Trimmer) सोने घेऊन जाताना पकडण्यात आले आहे.
सोशल मीडियावर समोर आलेल्या सोन्याच्या तस्करीच्या व्हिडीओमध्ये एक व्यक्तीने सोन्याची तस्करी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवलेली पाहायला मिळत आहे. कस्टम विभागाच्या नजरेतून सोने वाचवण्यासाठी या व्यक्तीने शेव्हिंग ट्रिमरची मदत घेतली आहे. सोन्याचे तस्कर वेगवेगळ्या मार्गाने तस्करी करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. त्याचवेळी, नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सीमाशुल्क विभागाने शेव्हिंग ट्रिमरमधून अर्धा किलो सोने जप्त केले आहे.
शारजाहून एअर अरेबियाच्या विमानाने हा व्यक्ती जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. जिथे कस्टम चेकिंग दरम्यान त्याच्याकडील तस्करी करत असलेले सोने पकडण्यात आले. त्यानंतर सामानाची कसून तपासणी केली असता, शेव्हिंग ट्रिमरमध्ये सोने आढळून आल्याने कस्टम अधिकारी चांगलेच चकित झाले.
सध्या या व्यक्तीकडून 491 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. ज्याची किंमत अंदाजे 25 लाख रुपये आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी त्या व्यक्तीने हे सोने बिस्किटांच्या रुपात ठेवले होते. या सोन्याच्या बिस्किटांना त्याने काळ्या कार्बन प्लास्टिक शीटच्या अनेक थरांनी लपवून ठेवली होती. सोशल मीडियावर एका व्यक्तीची तस्करी करण्याची कल्पना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ना हात, ना पाय... दिव्यांग रिक्षाचालक पाहून आनंद महिंद्रा अवाक्, दिली 'ही' ऑफर
- मुंबईत थर्टी फस्टचे सेलिब्रेशन यंदाही घरातच! सेलिब्रेशनवर येणार निर्बंध
- हाय हिल्समुळे गेला मलायका अरोराचा तोल, बॉयफ्रेंड अर्जुनही नाही सांभाळू शकला, अन्...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha